Sharad Pawar News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन नाशिकला झाले. यावेळी शेतकरी कर्जमाफी तातडीने करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी न केल्यास स्थिती गंभीर होईल, असा इशारा दिला.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आज शेतकऱ्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन झाले. विशेष म्हणजे या मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देण्यात आला आहे.
सरकारने राज्यातील परिस्थिती समजावून घ्यावी. मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहे. अशा स्थितीत आम्ही मुकदर्शक होणार नाही. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी कर्जमाफीची कार्यवाही आठ दिवसात सुरू न केल्यास याहून मोठे शक्ती प्रदर्शन होईल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या होर्डिंगचा उल्लेख केला. ते म्हणाले, देवाभाऊ केवळ होर्डिंग लावून चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श देखील घेतला पाहिजे.
आज सत्ता तुमच्या हाती आहे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी केला पाहिजे. दुष्काळ आल्यावर शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला सोने दिले. सोन्याचा फार करून जमीन नांगरणी केली. हा आदर्श सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला पाहिजे.
नाशिकचा कांदा उत्पादक संकटात आहे. निर्यातबंदीने त्याचे कंबरडे मोडले आहे. तुमच्या हाती सत्ता आहे. शेतकऱ्याला मदत करणे तुमचे कर्तव्य आहे. तसे घडले नाही तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. येत्या आठ दिवसात शेतकरी कर्जमाफीची कार्यवाही सुरू न केल्यास नाशिक ही संघर्षाची सुरुवात आहे. याहून प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन होईल. सरकारने त्यापासून बोध घ्यावा.
यावेळी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, जयंत पाटील, माझी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार, रोहिणी खडसे, खासदार भास्करराव भगरे, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे आदींसह विविध प्रमुख नेते उपस्थित होते.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.