Vasant Gite Politics; राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावरून वाद चिघळत आहे. काही नेत्यांनी पातळी सोडून विधाने केल्याने ही स्थिती झाली आहे. नेत्यांनी स्वतःच हे प्रकार थांबवावे, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होईल, असा संदेश समाजात पसरत आहे.
राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी आणि मंत्र्यांनी त्यावर समाजाला नेमकी स्थिती सांगितली पाहिजे. सध्या काही नेते दंड थोपटून अन्य घटकांना आव्हान देऊ लागले आहे. कोणत्याही नेत्याने पातळी सोडणे म्हणजे समाजात भांडणे लावण्याचाच प्रकार आहे, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते, माजी आमदार वसंत गिते यांनी दिला.
याबाबत एका नेत्याने थेट माता, भगिनींपर्यंत विधाने केली. त्याने समाजातील संवाद आणि समरसतेची विन विस्कटणार आहे. चांगले काहीच घडणार नाही. त्यामुळे संबंधित नेत्यांनीच हे प्रकार थांबवावे. प्रत्येकाने प्रत्येक समाजाच्या माता-भगिनींचा आदर केलाच पाहिजे police
ओबीसी आरक्षणावरून महायुती सरकारमध्ये मंत्र्यांमध्येच टाळमेळ राहिलेला नाही. उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जीआर काढतात. अन्य मंत्री त्याला विरोध करतात. हे महायुती सरकारचे अपयश मानले पाहिजे.
मराठा, ओबीसी आणि अन्य सर्वच समाज आरक्षणाविषयी अत्यंत संवेदनशील आहे. केंद्रात आणि राज्य भाजप सत्तेत आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन केंद्र शासनाला आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची विनंती करावी. तसे घडले तर सर्वच वाद संपुष्टात येतील.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.