NCP Nashik Politics on EC : निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दिलेल्या निर्णयाने नाशिकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त आहेत. या संदर्भात शरद पवार यांच्यामागे अधिक जोमाने उभे राहून नाशिक जिल्ह्यातील जनता आमच्या विरोधकांना कणखर उत्तर देईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. (Sharad Pawar News:)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सहा आमदार आहेत. हे सर्वच्या सर्व सहा आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे आदींचा समावेश आहे. आमदार गेले तरीही पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मात्र शरद पवार यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे निवडणूक नियोगाच्या निर्णयानंतर नाशिकमध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडल्या. कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन याबाबत मतप्रवाह निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. (Chhagan Bhujbal)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी भवन वर भुजबळांचा ताबा
नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन ही इमारत पक्षाचे अधिकृत कार्यालय होते. त्याच्या उभारणीत मंत्रिमंडळ भुजबळ यांनी योगदान दिले होते. मात्र हे कार्यालय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेच्या नावावर आहे. ही संस्था पक्षापेक्षा वेगळी आहे. मात्र भुजबळ यांच्या समर्थकांनी आणि खाजगी सुरक्षारक्षकांच्या मदतीने या कार्यालयावर पक्षात फूट पडल्यानंतर लगेचच ताबा मिळवला होता. सध्या त्याचा ताबा भुजबळ यांच्या गटाकडेच आहे. त्या विरोधात ट्रस्टचे विश्वस्त हेमंत टकले यांनी तक्रार देखील केलेली होती.
कार्यालयाचा ताबा घेण्यावरून वाद देखील निर्माण झाला होता. तरीही भुजबळ यांनी या कार्यालयावरील आपला ताबा कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर देत लगतच्या जागेतच पक्षाचे हंगामी नवीन कार्यालय उभे केले आहे. सध्या इथूनच सर्व कारभार चालतो आज दुपारी चार वाजता पक्षाचे सर्व पदाधिकारी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर घ्यावयाच्या भूमिकेबाबत आपले म्हणणे मांडणार आहेत.(NCP)
निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करते, हे देशातील सामान्य नागरिकांनाही कळून चुकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) संदर्भात घेतलेल्या निर्णयाने निवडणूक आयोग स्वतःच स्वतःची काय प्रतिमा आहे, याचे उदाहरण लोकांपुढे निर्माण करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) कार्यकर्ते अजिबात विचलित झालेले नाहीत.
या निर्णयाने आम्हाला अधिक पेशाने लढण्याची आणि आमच्या अस्तनीतील निखारे ओळखण्याची क्षमता दिलेली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मागे आणखी मोठे बळ उभे करण्याचा निर्धार निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आम्ही केला आहे. यापुढे शरदचंद्र गोविंद पवार हाच आमचा पक्ष असेल. हाच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील विचार असेल. दिल्लीतील अदृश्य शक्ती आणि अटकेच्या भीतीने लाळघोटेपणा करीत भाजपला शरण गेलेल्या नेत्यांना नाशिककरांचा संदेश आहे, अशा शब्दात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.