Lok Sabha Election 2024 : भाजपच्या इच्छुकांनी वाढवली गोडसेंची धडधड ? नाशिकमध्ये दिनकर पाटलांची मोठी खेळी

Dinkar Patil : नाशिक लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांना अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पाठिंबा
Dinkar Patil
Dinkar PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांना अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पाठिंबा मिळला. आपली दावेदारी पक्की करण्याचा प्रयत्न पाटील यांच्याकडून सातत्याने सुरू असून, आध्यात्मिक आणि धार्मिक आघाडीवर आपण कमी नसल्याचा संदेश दिनकर पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिक लोकसभेसाठी साधू महंत रिंगणात उतरले आहेत. ही जागा शिवसेनेची असताना भाजपकडून मात्र या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तूर्तास ही जागा कोणता पक्ष लढवणार हे स्पष्ट नसले तरी भाजपच्या दिनकर पाटील यांचा मागील काही महिन्यांपासून प्रचार सुरूच आहे. पक्ष निर्णय घेईल तो मान्य आहे. मात्र, उमेदवारीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे पाटील वारंवार सांगतात.

Dinkar Patil
Nitesh Rane : 'तुमच्या मतदारसंघात काय दिवे लावलेत ते सांगा?' मालेगावातील हिंदू-मुस्लिमांचा भाजपच्या 'या' नेत्याला सवाल

मध्यंतरी शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाटील यांनी गाठीभेटी घेतल्याच्या चर्चाही जोरात होत्या. मात्र, आपण पक्षनिष्ठ असून, पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट करीत या चर्चांवर पडदा टाकला होता. दरम्यान, नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी वेरूळ येथील संत जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज आणि स्वामी विवेकानंद मिशनचे स्वामी कंठानंद यांची नावे पुढे आली आहेत.

ही निवडणूक धार्मिक अंगाने जाण्याची शक्यता अधिक असल्याने पाटील यांना अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला. संस्थांचे प्रमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत.

याबाबत बोलताना भाजप (bjp) आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाप्रमुख निवृत्ती महाराज रायते यांनी सांगितले की, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना पक्षाने नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायला हवी. याचा फायदा नाशिकमध्येच नाही तर राज्यातही होईल. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय दिनकर पाटील यांच्या पाठीमागे उभा असल्याचे रायते यांनी स्पष्ट केले. दोन्ही संप्रदायाचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दिनकर पाटील यांच्याबाबत भाजप नेमका काय निर्णय घेते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Dinkar Patil
MLA Rohit Pawar : महाभारतातील 'तो' प्रसंग सांगत रोहित पवारांनी विरोधकांना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com