Sharad Pawar : वाढदिवसाला शरद पवार यांना नाशिककरांनी दिली अनोखी भेट!

Sharad Pawar Politics, CNP press workers leader Jagdish Godse given unique gift to Pawar-वाढदिवासाला नोटांची छपाई करणाऱ्या नोट प्रेसच्या कामगारांनी दिलेल्या नोटांच्या अनोख्या भेटीने शरद पवार सुखावले
Jagdish Godse & Sharad Pawar
Jagdish Godse & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांचा वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील समर्थक अनेक प्रकारे साजरा करतात. नाशिककरांनी मात्र हा वाढदिवस एक दिवस आधीच साजरा केला. त्यात येथील नोटांची छपाई करणाऱ्या प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी पवार यांना अनोखी भेट दिली. या अनोख्या भेटीने पवार देखील सुखावले.(Followers and party workers celebrate Sharad Pawar`s Birthday a day Before in Nashik)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज वाढदिवस, मात्र काल ते नाशिक (Nashik) दौऱ्यावर असल्याने त्यांच्या समर्थकांनी एक दिवस आधची धुमधडाक्यात साजरा केला. शरद पवार यांना नोट प्रेसच्या मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कर्मचाऱ्यांनी पवारांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने साजरा केला.

Jagdish Godse & Sharad Pawar
Maharashtra Politics: ...आता भाजपचे नेतेही म्हणू लागले, कांदा निर्यातबंदी नकोच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार यांच्या नाशिक दौऱ्यात सोमवारी त्यांचा वाढदिवस भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय कामगार प्रेस मजदूर संघाने साजरा केला. त्यात त्यांना अविस्मरणीय भेट दिली. पवार यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या तारखांच्या १०, २० व ५० रुपयांच्या नोटांचे तैलचित्र यांनी भेट दिले. पवार यांनी सर्व नोटांची बारकाईने पाहणी करून आनंद व्यक्त केला.

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पदाधिकाऱ्यांसह पवार यांची नाशिकमध्ये भेट घेतली. शरद पवारांचा बारामती येथे जन्म, प्रथम आमदारकाची शपथ, विवाह दिन, कॅबिनेट ते राज्यमंत्रीचा कार्यकाळ, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मुख्यमंत्री पदाची शपथ, केंद्रीय संरक्षण मंत्रिपदाचा शपथविधी, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर केल्याची तारीख आदी त्यात प्रमुख होत्या.

याशिवाय या खऱ्या नोटांच्या तैलचित्रात पहिल्या महिला धोरणाच्या मान्यतेची तारीख, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवड, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, देशाच्या कृषिमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे व त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले, या तारखांच्या १०, २० व ५० रुपयांच्या नोटाचे तैलचित्र गोडसे यांनी त्यांना भेट दिले.

भेटीदरम्यान गोडसे यांनी पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक नेला होता. तो पवार यांच्या हस्ते कापण्यात आला. मात्र, कापलेल्या केकचा तुकडा पवार यांनी प्रथम गोडसे यांना भरवून त्यांचे तोंड गोड केले. श्री. गोडसे विधानसभा निवडणुकीतील इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पवारांकडून गोडसेंना ही गोड बातमी तर नाही ना, अशी चर्चा सुरू होती.

Jagdish Godse & Sharad Pawar
Nagar Political News : 'शिंदें'ना बोलावलं अन् 'पवारां'ना टाळलं.. ; कर्जत एमआयडीसी बैठक..

या भेटीने श्री. पवार देखील सुखावले. त्यांनी या सर्व नोटांची बारकाईने पाहणी करून आनंद व्यक्त केला. कामगार नेते राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, अण्णा सोनवणे, योगेश कुलवदे, बाळू ढेरिंगे, बबन शहीद, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, सचिन दिवटे, संदीप व्यवहारे, राजू लहांगे, दशरथ बोराडे, विनोद घाडगे, सुनील नाईक, किशोर गांगुर्डे, मनोज सोनवणे, कैलास मुठाळ, सुधीर पगारे, उमेश गोडसे, संजय गुंजाळ, भगवान बिडवे, आप्पा जगताप, नंदू कदम, संतोष कुलथे आदी उपस्थित होते.

Jagdish Godse & Sharad Pawar
Udayanraje Bhosale: उदयनराजेंची शरद पवारांसाठी खास पोस्ट; चर्चा लोकसभेची!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com