Sharad Pawar News : ‘गोवारी’ वरून पवारांच्या माहितीने देवेंद्र फडणवीस सापळ्यात अडकले!

Sharad Pawar reprimanded the state government on there policy-शरद पवार यांनी राज्यातील भाजप प्रणीत सरकारच्या धोरणावर सडकून टिका केली.
Sharad Pawar & devendra Fadanvis
Sharad Pawar & devendra FadanvisSarkarnama

Sharad Pawar criticized BJP : भाजपच्या काही नेत्यांनी शरद पवार यांच्यावर नागपूर येथील गोवारी घटनेबाबत टिका केली होती. या नेत्यांचा पवार यांनी आज चागंलाच समाचार घेतला. गोवारी घटना पोलिसांच्या लाठीमाराने नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे घडली होती, अशी माहिती त्यांनी दिली. (Sharad Pawar reprimanded BJP leaders for missleading `Govari` Issue)

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची आज जळगाव (Jalgaon) येथे सभा झाली. यावेळी त्यांनी जालना येथील मराठा (Maratha) उपोषणकर्त्यांवरील लाठीमाराबाबत राज्य सरकारमधील नेते वेगवेगळी कारणे सांगत असतील तर हे बरे नाही, या शब्दांत राज्य सरकारला खडसावले.

Sharad Pawar & devendra Fadanvis
Sharad Pawar on INDIA : 'इंडिया' शब्द हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही : पवार थेट बोलले

ते म्हणाले, जालन्यातील आंदोलनाच्या मुद्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी व मावळ येथील घटनांचा उल्लेख केला. त्यासंदर्भात पवारांना विचारले असता ते म्हणाले, गोवारी प्रकरणातील मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाले होते. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे लाठीमार झाला नव्हता. तरीही आम्ही त्या- त्या वेळी तत्कालीन संबंधित मंत्री मधुकर पिचड व आर.आर. पाटील यांचे राजीनामे घेतले होते.

ज्येष्ठ नेते पवार यांच्या या माहितीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आहेत. राजकीय आरोप, प्रत्यारोप करण्याच्या नादात ते स्वतःच आपल्या सापळ्यात अडकले आहेत. पवारांच्या या गुगलीने भाजपीच राजकीय कोंडी झाली हे मात्र नक्की.

Sharad Pawar & devendra Fadanvis
Pankja Munde; पंकजाताई मुंडे यांचे भाषण नागरिकांनी भरपावसात ऐकले!

‘वन नेशन- वन इलेक्शन’ अशक्य

देशभरात ‘वन नेशन वन इलेक्शन’ची तयारी सुरु केल्यासंबंधी पवार म्हणाले, सध्या तरी हे शक्य वाटत नाही. सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन अचानक बोलावले आहे. त्याबाबत कुणालाही विश्‍वासात घेतलेले नाही. देशापुढील अन्य महत्त्वाच्या विषयांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकार सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अरुणभाई गुजराथी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार रोहित पवार, सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com