Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल आहेत. पण आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, आमच्या विठ्ठलाभोवती पण त्यांच्याभोवती बडव्यांचं गराडं आहे. त्यांना दूर करून आम्हाला आशिर्वाद द्या, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. ते मुंबईतील एमईटी संस्थेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात केली.
काय म्हटलं आहे, जितेंद्र आव्हाड यांनी?
भूजबळ यांच्या या टीकेनंतर स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावनिक साद घातली आहे. "आम्ही बडवे आहोत तर आम्ही पक्ष सोडतो, पण तुम्ही सर्वांनी परत या. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, आपण यापासून दूर निघून जाऊ." ठाणे टोलनाक्यावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजितदादांना परत येण्यासाठी साद घातली आहे.
मी आज शपथ घेणार आहे. तुम्ही परत या, मी आयुष्यात परत कधीही राजकारणात दिसणार नाही. मी दूर निघून जाईल, मला सत्तेचं राजकारण करायचं नाही, मला पैशाचं, साखरेचं, बँकेचं की कुठलचं राजकारण करायचं नाही, महाराष्ट्राचा शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे, साहेबांची ताकद वाढत गेली पाहिजे. अशी माझी भावना आहे.
"माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर ढकलल्यावर पक्ष वाढणार असेल तर मी साक्ष देऊन सांगतो मी तर जाईलच पण जयंत पाटील यांनाही घेऊन जाईल. पण आम्ही बडव्यांनी साहेबांना घेरलंय असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही सोडून जातो, पण तुम्ही परत या, साहेबांना त्रास देऊ नका." असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.