Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal : शरद पवार येवल्यात मोठा डाव टाकणार, भुजबळांविरोधातला उमेदवार ठरला ? भाजप नेताच गळाला ?

Sharad Pawar Political News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघातून विधानसभा त्या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांच्याविरोधात आता शरद पवार येवल्यातून कोणाला उभे करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवारी (ता.19) नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी छगन भुजबळांच्या विरोधात येवल्यातून इच्छुक असलेल्या भाजप नेत्या अमृता पवार यांनी पवारांच्या व्यासपीठावर आल्या अन् सर्वांनाच आश्चचर्याचा धक्का बसला.

विशेष म्हणजे त्यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) सत्कार केला. तो पवारांनी स्विकारला. मंत्री आणि अजित पवार गटाची धडाडती तोफ छगन भुजबळांसाठी अमृता पवार यांच्या माध्यमातून मोठा डाव टाकणार असल्याचे संकेतच शरद पवारांनी दिल्याचे बोलले जात आहे.

सहकारमहर्षी (कै.) मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्याला जिल्ह्याभरातील विविध पक्षांतील शरद पवार समर्थक नेते झाडून हजर होते. यामध्ये चर्चेचा विषय ठरली, ती सध्या भाजपात असलेल्या अमृता पवार यांची उपस्थिती लावली.

या कार्यक्रमात विविध राजकीय संदर्भ दिसून आले. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र होऊ शकते याची चाहूल दिसली. शरद पवार यांच्याबरोबर गेल्या 39 वर्षांत काम केलेल्या अनेक नेत्यांनी पक्ष भेद विसरून पवार यांचे स्वागत केले.

यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला ते भाजपच्या नेत्या अमृता पवार. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात येवला मतदारसंघातून विधानसभा त्या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांच्याविरोधात आता शरद पवार येवल्यातून कोणाला उभे करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गोदावरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम निफाडमध्ये होता. अमृता पवार यादेखील निफाडच्याच आहेत. त्यामुळे या स्वागताच्या वेळी उपस्थितानी टाळ्यांचा कडकडाट करून एक वेगळाच संदेश दिला.

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Congress News : काँग्रेसही मागे नाही तेवढेच दमदार पाऊल उचलणार; खास भाजपसाठी प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करणार

तीन दिवसांपूर्वीच राज्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षण आणि ओबीसींचा वाद यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी केली होती. आजचा कार्यक्रम बिगर राजकीय स्वरूपाचा होता. या कार्यक्रमाला भुजबळ गैरहजर होते. भुजबळांच्या कट्टर विरोधक म्हणून अमृता पवार यांच्याकडे पाहिले जाते.

त्या गेली दोन वर्ष येवला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या आजच्या दौऱ्यातून एक वेगळा संदेश गेला आहे. हा राजकीय संदेश थेट भुजबळ यांना आहे हे लपून राहिलेले नाही.

यासंदर्भात अमृताताई पवार म्हणाल्या, ज्येष्ठ नेते शरद पवार हे देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी कोणतेही निमंत्रण लागत नाही. आजचा कार्यक्रम हा बिगर राजकीय स्वरूपाचा होता. त्यामुळे मी स्वागताला आले होते अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अमृता पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. यातून भुजबळ यांना जो संदेश जायचा होता तो गेलाच आहे. विशेषत: येवला मतदारसंघातील अनेक राजकीय नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली आता गतिमान होऊ शकतील.

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Eknath Shinde : 'सुधीरभाऊ, तुम्ही वेळेवर ही वाघनखं आणली'; CM शिंदेंना विधानसभेपूर्वी म्हणायचं होतं का...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com