NCP Sharad Pawar Politics: महाविकास आघाडीत सध्या तरी बिघाडी, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांची कबुली!

Shashikant Shinde;Shashikant Shinde admitted to the rift in the Mahavikas Aghadi -महाविकास आघाडीचे नेते एकसंघ असते तर महायुतीच्या दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले असते.
Shashikant-Shinde.jpg
Shashikant-Shinde.jpgSarkarnama
Published on
Updated on

Shashikant Shinde News: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीत बिघाडी होती. याची कबुली खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होते याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी नाशिक शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद साधला. पक्षाची संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा होता. या दौऱ्यातही कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला.

सध्या महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. महायुतीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला विशेष टार्गेट केले आहे. त्यामुळे अनेक नेते पक्ष सोडत असल्याचे दिसते. त्याचा परिणाम महाविकास आघाडीतील समन्वयांवर देखील झाला आहे.

Shashikant-Shinde.jpg
Rajabhau Vaje Politics: खासदार वाजे यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांच्या प्रदिर्घ बैठकीत हवाई सेवेचे कोणते दहा विषय मांडले?

महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिसले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी देखील अप्रत्यक्षपणे ते मान्य केले आहे. आघाडीचे पक्ष आणि नेते एक संघ असते तर अधिवेशनावर अधिक प्रभाव पडला असता. दोन मंत्र्यांचे राजीनामे आम्हाला सहज घेता आले असते, असे ते म्हणाले.

महायुतीचे सरकार आपल्याच मस्तीत आहे. या सरकारमधील मंत्री आणि नेते यांच्यामुळे सरकारच्या कारभाराची लक्तरे रोज बाहेर पडत आहेत. त्या स्थितीत महाविकास आघाडी एक संघ राहिली तर सरकारला अडचणीत आणण्याची संधी आपोआप मिळेल. अधिवेशन काळात देखील आम्हाला दोन मंत्र्यांचे राजीनामे घेता आले असते. आमच्याच घटक पक्षांत एकी दिसली नाही त्यामुळे ते टळले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सध्याचे सरकार अत्यंत बेफिकीर असल्याचे वारंवार दिसून आले आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेली विधाने हे त्याचे प्रतीक आहे. संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मोठा मोर्चा काढण्यात येईल. पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच त्याच्या तयारीला लागावे असे आवाहन यावेळी त्यांनी पक्षाच्या बैठकीत केले.

सध्याचे सरकार उद्योगपतींना पायघड्या घालणारे आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांची आणि मराठी माणसांची त्याला कोणतीही फिकीर दिसत नाही. उद्योगपतींना हवे ते देव अशी भूमिका असलेले हे सरकार उद्योगपतींच्या माध्यमातून मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप देखील शिंदे यांनी केला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com