Hemant Godse On Chhagan Bhujbal: पराभव गोडसेंचा, खापर भुजबळांवर? म्हणाले, निवडणुकीत माझं कामं कोणी केलं नाही ते...

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव झाला. तर शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे या मतदारसंघातून विजयी झाले.
Hemant Ghodse, Chhagan Bhujbal
Hemant Ghodse, Chhagan BhujbalSarkarnama

Hemant Godse On Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे या मतदारसंघातून विजयी झाले. गोडसे यांनी आपल्या पराभवाची विविध कारणे आज सांगितली.

पराभवाची कारणे सांगताना हेमंत गोडसे म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर करण्यास मोठा विलंब झाला. या विलंबामुळे माझ्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते विरोधी उमेदवार राजाभाऊ वाजे यांना जाऊन मिळाले झाले. मला उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रचारासाठी अवघ्या 15 ते 16 दिवसांचा कालावधी मिळाला. त्यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ नव्हता तसेच वाजे यांच्याकडे गेलेले कार्यकर्ते पुन्हा परत आले नाहीत. हे एक माझ्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.

माझी उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाला. या कालावधीत अनेक उमेदवार इच्छुक म्हणून चर्चेत आले. या इच्छुकांचे नावे पुढे आल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. शिवाय मला यांना उमेदवारी मिळेल की नाही, अशी अनिश्चितता निर्माण झाली होती. त्याचा फटका बसल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तुमचा प्रचार केला का? या प्रश्नावर माजी खासदार गोडसे यांनी पॉज घेत, "कोणी निवडणुकीत काम केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहित आहे" असे ते म्हणाले. त्यामुळे गोडसे यांना नेमकं काय म्हणायचं होतं आणि त्यांनी स्पष्ट शब्दात भुजबळांनी काम केलं असं का सांगितलं नाही. याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Hemant Ghodse, Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis: फडणवीस जिगरबाज नेते, त्यांनी पळून जावू नये…, काँग्रेसच्या नेत्याकडून कौतुक की टोला?

तर यानंतर त्यांनीभारतीय जनता पक्ष मनसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून माझा प्रचार केल्याचं सांगितलं. तसंच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचारामध्ये चांगला समन्वय होता, असंही त्यांनी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com