Sanjay Raut News; मला 110 दिवस तुरुंगात ठेवले, त्याची परतफेड करीनच!

मोदी यांनी कितीही जोर लावला तरीही मुंबईवरचा भगवा उतरणार नाही.
MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama

नाशिक : (Nashik) सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सतत मुंबईला (Mumbai) चकरा मारत आहेत. मात्र त्यांनी (BJP) कितीही जोर लावला तरी मुंबईवरील भगवा कोणीही उतरवू शकत नाही. मुंबईकर नागरिक आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील अतुट नाते गद्दारांनी बुद्धीभेद केला तरी तुटणार नाही, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. (Let BJP try but no body able to down saffron flag from Mumbai)

MP Sanjay Raut
Udayanraje News; राजकारणात निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे!

शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या अभीष्टचिंतन सोहळा खासदार राऊत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. आगामी 2024 मध्ये नाशिकसह महाराष्ट्रात भगवा पडकवू असे राऊत म्हणाले.

MP Sanjay Raut
BJP : एका शब्दामुळे राऊतांनंतर आता चित्रा वाघ होताहेत ट्रोल

नाशिक शहरात जेव्हा शिवसेनेचे पहिले अधिवेशन झाले होते, त्यावेळी राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. विधानसभेवर भगवा फडकला होता. आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांत नाशिकच काय तर राज्यात पुन्हा भगवा फडकवू असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. बागुल यांनी वाढदिवसानिमित्त शहरभर शिवसेनेचे फलक लावले होते. हा संदर्भ घेत राऊत म्हणाले, पंचवटीसह नाशिकमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना मतदार, नागरिक काहीही महत्त्व देत नाहीत. शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर चालणारी, मराठी माणसांचा व हिदुत्वाचा विचार करणारा पक्ष आहे. आतापर्यंत आले किती गेले किती मात्र शिवसेनेचा दरारा कायम आहे. मला ११० दिवस तुरुंगात ठेवले मी सत्तेत आल्यास त्याची व्याजासहित परतफेड करील.

शिवसेनेचा रंग आणखी गडद होऊ द्या. आज नाशिकमधील एक बाई शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात गेली. ती किती लाखात गेली असा प्रश्न त्यांनी केला. शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शिंदे गटाने नाशिकमध्ये एजंट सोडले आहे. ते एजंट दहा-बारा लाख रुपयांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्यवहार करतात. मात्र प्रत्यक्षात प्रवेश केलेल्या लोकांच्या हातात सव्वा लाखच पोहोचवतात. गद्दारांना जनता माफ करणार नाही. राजकारणात जेव्हा काही नवीन व मोठे घडतं ते नाशिकमधूनच घडते. एवढे पावित्र्य नाशिकच्या भूमीत आहे.

यावेळी आमदार दिलीप बनकर, उपनेते बागूल, शुभांगी पाटील, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com