Chandrakant Raghuvanshi: शिंदेंच्या शिलेदारानेच केला भाजप उमेदवाराचा 'गेम'; हिना गावित यांचा का झाला पराभव

Nandurbar Lok Sabha Election Chandrakant Raghuvanshi on Heena Gavit: भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आपण उमेदवार बदलण्याबाबत मागणी केली होती, पण तोच उमेदवार दिल्याने हिना गावित यांच्या विरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याची कबुली चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
Chandrakant Raghuvanshi on Heena Gavit
Chandrakant Raghuvanshi on Heena GavitSarkarnama

Nandurbar News: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांचा काँग्रेसचे नवखे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी (Gowal Padavi) यांनी १ लाख ५९ हजार १२० मतांच्या फरकाने पराभव करीत विजय मिळविला. लोकसभा निवडणूक निकाल लागून महिना झाल्यानंतरही नंदुरबारमधील विजय-पराजयाचे कवित्व अद्यापही संपलेले दिसत नाही.

शिवसेना शिंदे गटाचे धुळे नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम करीत,काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचे काम केल्यामुळेच महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांचा पराभव झाल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. नंदुरबार येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला साथ दिल्याची कबुली रघुवंशी यांनी दिली आहे.

भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आपण उमेदवार बदलण्याबाबत मागणी केली होती, पण तोच उमेदवार (हिना गावित) दिल्याने हिना गावित यांच्या विरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याची कबुली चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

भाजपच्या वरिष्ठांनी आपले म्हणणे न ऐकल्यामुळेच महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजेच हिना गावित यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यात काल (रविवारी) कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत रघुवंशी यांनी हा गौप्यस्फोट केला.

Chandrakant Raghuvanshi on Heena Gavit
Video Mumbai Heavy Rain: मुंबईतील पावसाचा फटका आमदारांना; मदत, पुनवर्सन मंत्री अनिल पाटील अडकले ट्रेनमध्ये!

धुळे शहर विधानसभा निवडणूक लढवण्याचे देखील संकेत चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले आहे. चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिना गावित यांचा पराभव का झाला याचे कारण रघुवंशी यांनी काही दिवसापूर्वीही सांगितले होते. "आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे ७४ हजार मतांनी विधानसभेला निवडून येतात. मात्र डॉ. हिना गावित यांना त्यांच्या मतदारसंघात केवळ ३० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे डॉ. हिना गावित यांच्या पराभवाला विजयकुमार गावित हेच कारणीभूत आहेत," असा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com