Video Mumbai Heavy Rain: मुंबईतील पावसाचा फटका आमदारांना; मदत, पुनवर्सन मंत्री अनिल पाटील अडकले ट्रेनमध्ये!

MLA hit By Heavy Rain In Mumbai Anil Patil Amol Mitkari: अनिल पाटील, आमदार मिटकरी, संजय गायकवाड, हरिष पिंपळे, संजय सावकारे, एकनाथ खडसे, किशोर पाटील, माजी आमदार जोगेंद्र कवाडे आदी 10 ते 12 आमदारांना पावसामुळे ट्रेनमध्ये अडकले आहेत.
MLA hit By Heavy Rain In Mumbai Anil Patil Amol Mitkari
MLA hit By Heavy Rain In Mumbai Anil Patil Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Heavy Rain: मुंबईतील पावसाचा फटका सर्वसामान्यांना नव्हे तर विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी निघालेल्या 10 ते 12 आमदारांनाही बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकले होते. अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील ट्रॅकवर चालत बाहेर निघाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

विदर्भ, अमरावती ट्रेनमध्ये कुर्ला येथे अडकली आहेत. तीन तासापासून ही ट्रेन या ठिकाणी अडकली आहे. त्यामुळे अनिल पाटील, अमोल मिटकरी हे ट्रेनमधून उतरुन ट्रॅकवर दीड किलोमीटरपर्यंत चालत जात आहेत. याबाबत साम टिव्हीने अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला.

मिटकरी म्हणाले, "अधिवेशनासाठी आम्ही विदर्भ एक्सप्रेसने निघालो होतो आता दीड तास झाले तरी ट्रेन दादरच्या अलीकडे थांबली आहे. त्यामुळे आम्ही ट्रेनमधून उतरुन ट्रॅकवर चालत आहोत. याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नाही, पावसामुळे आम्ही विधिमंडळ सभाग़हापर्यंत पोहचणार की नाही, हे आता सांगता येणार नाही,"

मंत्री अनिल पाटील, आमदार मिटकरी, आमदार संजय गायकवाड, आमदार हरिष पिंपळे, संजय सावकारे, एकनाथ खडसे, किशोर पाटील, माजी आमदार जोगेंद्र कवाडे आदी 10 ते 12 आमदारांना पावसामुळे ट्रेनमध्ये अडकले आहेत.

MLA hit By Heavy Rain In Mumbai Anil Patil Amol Mitkari
Sanjay Shirsat: धक्कादायक: आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक

महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यासह पाच ते सहा आमदार या ट्रेनमध्ये अडकले आहेत. सिध्देश्वर एक्सप्रेस गाडी कुर्ला येथे अडकली आहे. सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि औसा मतदारसंघ आमदार अभिमन्यू पवार हे देखील ट्रेनमध्ये अडकले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com