Radhakrishna Vikhe Won Election : राधाकृष्ण विखेंचा दणदणीत विजय; म्हणाले, 'विजय जनतेला समर्पित'

Shirdi Assembly Constituency Result 2024 : शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे, काँग्रेसच्या प्रभावती घोगरे आणि भाजपचे बंडखोर नेते राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत होती.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe Sarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Won Kopargaon Assembly Election 2024 : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दणदणीत विजय मिळवला. विखे पहिल्या मतमोजणीत फेरीपासून आघाडीवर होते. राधाकृष्ण विखे सलग आठव्यांदा शिर्डी मतदारसंघातून विजयी झाले. इथं काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला आहे. 'हा विजय माझ्या जनतेचा आहे आणि विजय जनतेलाच समर्पित आहे', अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखेंनी विजयानंतर दिली.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण 74.52 टक्के मतदान झाले आहे. वाढलेला मतटक्का भाजपच्या उमेदवाराच्याच पथ्यावर पडले आहे. राधकृष्ण विखे पाटलांना तब्बल 50 हजार 517 मतांची विक्रमी आघाडी मिळाली. राधकृष्ण विखे पाटलांना यंदा 1 लाख 20 हजार 482 मते पडली. तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंना 60 हजार 965 मते मिळाली. भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांना केवळ 1 हजार 390 मते मिळालीत. बंडखोराला घरचा रस्ता दाखवण्यात विखे पाटलांना यश आले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचा बालेकिल्ला. त्यामुळे विखेंच्या बालेकिल्ल्यातील यंदाची निवडणुकीत ही वेगळ्याच पातळीवर पोचली. काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांनी विखेंना चांगलेच आव्हान उभं केले होते. घोगरे यांच्यामागे महाविकास आघाडीने मोठी ताकद उभी केली होती. यातच शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिर्डीत सभा घेऊन प्रभावती घोगरे यांना बळ दिले. भाजपने या मतदारसंघातून पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे इतर पक्ष विखे पाटील यांच्या या मजबूत किल्ल्यात धक्का देऊ शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विखे पाटील यांच्या पुन्हा निवडणुकीत उतरल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय लढत आणखी रोचक बनली आहे.

Radhakrishna Vikhe
Dhananjay Munde Won: परळी मुंडेंचीच..! शरद पवारांना मोठा धक्का, राजेसाहेब देशमुखांचा पराभव

मंत्री राधाकृष्ण विखे हे जसे बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन शिवसेना उमेदवार अमोल खताळ यांना बळ देते होते, तसेच शिर्डीत (Shirdi) बाळासाहेब थोरात आणि खासदार नीलेश लंके यांनी मंत्री विखेंविरोधात उमेदवार घोगरे यांना ताकद देते होते. यातून विखे-थोरात यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता. विखे यांनी घोगरे यांच्यापेक्षा त्यांना ताकद देणारे थोरात यांना टार्गेट करत होते. घोगरे मात्र विखेंविरोधात टीका करताना सुसाट सुटल्या होत्या. प्रत्येक सभेत त्यांचा समाचार घेत होत्या. परंतु विखेंचे ग्राऊंड लेवलवर सूक्ष्म नियोजन होते.

Radhakrishna Vikhe
Maharashtra Assembly Result 2024 : महाविकास आघाडीचा धुव्वा, महायुती सर्व जागांवर आघाडी!

पिपाडांची उमेदवारी

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक डाॅ. राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यांचा वैयक्तिक विखेंविरोधात रोष कायम आहे. भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. विखेंना उमेदवारी दिल्यास भाजपची एक जागा कमी होईल, असा पत्रव्यवहार पिपाडा यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता. तसंच पिपाडा यांनी 2009 मध्ये विखेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात पिपाडा यांचा अवघा 13 हजार मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे. भाजपने यांच्यावर देखील कारवाई केली नाही. पिपाडा यांचा समजूत काढण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी मुंबईवरून चार्टर प्लेन पाठवून बोलावून घेतले होते. परंतु त्याचाही फायदा झाली नाही. पिपाडा निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले. परंतु प्रचारात पिपाडा कोठे हे शेवटपर्यंत समोर आले नाही. त्यामुळे त्यांनी उमेदवारी का केली, असा प्रश्न कायम आहे.

2024 मधील उमेदवार

राधाकृष्ण पाटील विखे (BJP), प्रभावती जनार्दन घोगरे (INC), राजू सादिक शेख (VBA), मोहम्मद इशाक इब्राहिम शाह (BRJP), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (HEAP), राजेश नामदेव लुटे (MNS), रामनाथ भाऊसाहेब सदाफळ (अपक्ष), प्रकाश ज्ञानदेव कापसे (अपक्ष), अविनाश मंगल अशोक शिंदे (अपक्ष), तुषार गणेश सदाफळ (अपक्ष), रेश्मा अल्ताफ शेख (अपक्ष), डॉ. राजेंद्र मदनलाल पिपाडा (अपक्ष), मयूर संजय मुर्तडक (अपक्ष), ममता राजेंद्र पिपाडा (अपक्ष).

2019 आणि 2014 मधील राजकीय स्थिती

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात काँग्रेसने सुरेश थोरात यांना उभे केले होते. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विखे यांना काँग्रेसच्या उमेदवार थोरात यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट मते मिळाली. या निवडणुकीत भाजपला 70 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. तर काँग्रेसला 24.26 टक्के मते मिळाली. विखे पाटील यांनी 87 हजार 024 मतांनी निवडणूक जिंकली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. त्यावेळी शिवसेनेने अभय दत्तात्रेय यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपने राजेंद्र भाऊसाह गोंडकर यांना उमेदवार म्हणून उभे केले होते. या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. विखे यांना 1 लाख 21 हजार 459 मते मिळाली. भाजप उमेदवारांना फक्त 17 हजार 283 मते मिळाली होती. हार आणि विजय यामध्ये 74 हजार 662 मतांचा फरक होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com