Radhakrishna Vikhe On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं वेग पकडला, दोन्ही बाजूनं चर्चेचा 'श्रीगणेशा' होईना; विखे पाटील अन् सामंतांचा अजून संपर्कच नाही!

Radhakrishna Vikhe Patil Reacts on Manoj Jarange Maratha Reservation Protest in Mumbai : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनासाठी जात असलेल्या मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासंदर्भात कोणतीही तयारी झाली नसल्याचं भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
Radhakrishna Vikhe On Manoj Jarange
Radhakrishna Vikhe On Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Maratha quota protest : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहे. शिवनेरी इथं ते रात्री उशिरापर्यंत पोचतील. परंतु सरकारकडून त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात अजून कोणतेही ठोस पावलं उचलली गेली नसल्याचं समोर येत आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समोर येत होत.

यावर जरांगे पाटील यांनी देखील चर्चा होईल, पण ती बंद दाराआड होणार नाही, सर्वांसमोर येईल, असं सांगितलं होतं. परंतु आता मंत्री विखे पाटील यांनी चर्चेसंदर्भात अजून मंत्री सामंत यांच्याशीच संपर्क झाला नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जरांग पाटील यांच्याशी चर्चाच्या फक्त चर्चाच ठरल्याचं मंत्री विखे पाटलांच्या प्रतिक्रियेवरून समोर आलं आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावर त्यांनी मुंबईकडे जात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चे संदर्भात प्रतिक्रिया दिली. मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर मंत्री विखे पाटील म्हणाले, 'अशी काही चर्चा झालेली नाही. भेट घेण्याचं प्रयोजन नाही. अशा कुठल्या भेटी संदर्भात माझं अन् मंत्री उदय सामंतांशी बोललं झालेलं नाही.'

Radhakrishna Vikhe On Manoj Jarange
National Election Watch: भाजपच्या 75 उमेदवारांचे लीड घटले; गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्क्यांची घसरण

'शेवटी आंदोलनकर्त्यांची तयारी देखील पाहिजे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पूर्वी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यांची तयारी असेल सरकारबरोबर चर्चा करायची, तर आम्ही तयार आहोत. चर्चेसाठी दोन्ही बाजूने समन्वय झाला पाहिजे,' असेही भाजप (BJP) मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

Radhakrishna Vikhe On Manoj Jarange
Amruta Fadnavis on Rahul Gandhi : राहुल गांधींची मतदार हक्क यात्रा बिहारमध्ये, पडसाद महाराष्ट्रात; अमृता फडणवीस म्हणाल्या, 'सद्बुद्धि...'

मुंबईतील आंदोलनावर न्यायालयाने काही अटी-शर्ती घालून एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, 'त्यांनीच (जरांगे पाटील) न्यायालयावर विश्वास व्यक्त केला आहे. आता त्यांनीच त्यावर निर्णय करायचा आहे.' मग यावर जरांगे पाटील यांनी एका दिवसात सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावं, असे म्हटलं आहे. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी, 'हैदराबाद गॅझेट संदर्भात जो त्यांचा आग्रह आहे की, त्यानुसार निर्णय करावा. त्यासाठी त्यांनीच मागणी केली होती की, मुदतवाढ द्यावी. त्यांची विनंती मान्य केली. न्यायमूर्ती शिंदे यांनी देखील किमान सहा महिने मला याच्या अभ्यासासाठी लागतील. न्यायमूर्ती शिंदेंवर त्यांचा विश्वास आहे, सरकारने समिती नेमली आहे, आता आपण सकारात्मकपणे पुढे पाऊल टकतोय,' असे सांगितले.

दाखले वितरणासाठी कालमर्यादेत कार्यक्रम

तसंच, 'हैदराबाद ग्रझेट संदर्भात देखील पूर्वी दाखले मिळाले होते. जिल्हा पातळीवरून दाखले दिले जात आहेत, त्यासाठी जात पडताळणी समिती आहेत, त्यावर बरेच भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. या समितीच्या अध्यक्षपदी अतिरीक्त जिल्हाधिकारी नेमलेले आहेत. यावर देखील जातीचे दाखले देताना कोणतीही अडवून होत असेल, अन् यासंदर्भात काही तक्रारी आल्यावर त्यावर आपण कारवाई करू. यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेऊन, ज्यांचे अर्ज आहेत, जे पात्र आहेत, यांच्यासाठी विशिष्ट कालमर्यादा निश्चित करून, ते दाखले देण्याची व्यवस्था करू,' अशी स्पष्ट भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

सरकार प्रतिष्ठेचा प्रश्न करणार नाही

जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाकडून चर्चेचा निरोप आल्यावर जाणार का? या प्रश्नावर भाजप मंत्री विखे पाटील म्हणाले, 'अजून तशी काही चर्चा नाही. त्यांचा प्रवास सुरू आहे. ते रात्री उशिरा शिवनेरीला पोचतील. सरकार कोणताही प्रश्न प्रतिष्ठेचा करत नाही आणि करणार देखील नाही. पूर्वीही केला नव्हता आणि आता देखील करणार नाही, अशी भूमिकेत आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com