
Rahul Gandhi Bihar Voting Rights Yatra : बिहार निवडणुकीतील वातावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्यावर चांगलच तापवलं आहे. मत चोरीचा उदाहरण देताना, राहुल गांधी महाराष्ट्रातील उदाहरण देत आहेत. राहुल गांधी यांचे मत चोरीचे आरोप केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसह महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकारला चांगलेच झोंबत आहेत.
भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राहुल गांधी यांना 'सीरियल लायर' म्हटलं आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता गणेशोत्सवासाठी मुंबईत आहेत. मुंबईतील मानाच्या लालबागचा राजाचं दर्शनानंतर अमृता फडणवीस यांनी काँग्रेसच्या (Congress) राहुल गांधी यांच्या मतदान हक्क यात्रेवर प्रतिक्रिया दिली. पण आजचा गणरायचा आगमानाचा पहिला दिवस आहे. त्यामुळे जास्त काही बोलणार नाही, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाले, "आजचा दिवस इतका सुंदर आहे की मला विरोधाबद्दल बोलायलाही आवडणार नाही. मी फक्त एवढेच म्हणेन की बाप्पा सर्वांना सद्बुद्धि देवो." संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पांच्या आगमनामुळे आनंदी वातावरण आहे. बाप्पा आपल्याबरोबर पुढील दहा दिवस राहणार असल्याने, त्याचा आनंद आहे. हा गणेशोत्सव साजरा करताना, पर्यावरणाची देखील जपवून करा, असं आवाहनही अमृता यांनी केलं.
पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनीच पुढाकर घेण्याचं आवाहन करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, "मातीचे गणपती आणा आणि विसर्जनासाठी फक्त पालिकेने बांधलेल्या तलावांचाच वापर करा. मी बाप्पाला प्रार्थना करते की तो महाराष्ट्रातील लोकांना आनंद आणि समृद्धी देईल आणि कोणत्याही आपत्तीपासून त्यांचे रक्षण करो."
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धेश कोरगावकर यांनी आम्ही 98 वा गणेशोत्सव साजरा करत आहोत. हा लालबाग परिसरातील सर्वात जुना गणपती आहे. 22फूट उंच मूर्ती बनवण्यात आली आहे. मूर्ती आणि सजावटीमध्ये रामेश्वरमची थीम दाखवली आहे, ज्यामध्ये हनुमानजी रामेश्वरमहून भगवान शंकराची मूर्ती आणतात. त्याच कथेनुसार, मूर्ती आणि सजावटीमध्ये रामेश्वरमची झलक दिसते.
राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेचा आज 11वा दिवस आहे. ही यात्रा मुझफ्फरपूरला पोचली आहे. तिथं राहुल गांधी यांची सभा झाली. त्यात राहुल गांधी यांनी मत चोरीवर पुन्हा हल्ला चढवला. ते म्हणाले, 'या लोकांनी महाराष्ट्र आणि गुजरातच्या निवडणुका चोरल्या. हे 2014च्या आधी गुजरातमध्ये सुरू झाले होते. गुजरात मॉडेल हे आर्थिक मॉडेल नाही.' गुजरात मॉडेल हे मत चोरीचे मॉडेल आहे. या लोकांनी 2014मध्ये ते राष्ट्रीय पातळीवर आणले. आमच्याकडे पुरावे नव्हते म्हणून आम्ही काहीही बोललो नाही, पण आम्हाला महाराष्ट्रात पुरावे सापडले आहेत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.