Shirdi News: 'वंचित'मुळे 'महाविकास'मध्ये तिढा वाढला; शिर्डीवर काँग्रेसचा दावा

Shirdi Lok Sabha Constituency 2024 : जागा वाटपाचा घोळ वाढला, बैठकांचे सत्र वाढणार
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Nagar: 'वंचित'चा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश झाल्याने राज्यात महाविकास आघाडीच्या लोकसभेसाठी जागा वाटपाची गणिते बदलण्याची शक्यता आहे. या राजकीय गणिताच्या केंद्रस्थानी नगर जिल्हा असू शकतो. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत स्पष्टता नसतानाच काँग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. यातून जागा वाटपाचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीमध्ये 'वंचित'चा प्रवेश झाल्यानंतर मुंबईत काल बैठक झाली. बैठकीत राज्यातील लोकसभा जागा वाटपावर पुन्हा चर्चा झाली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, तर ठाकरे गटाकडून प्रवक्ते खासदार संजय राऊत, विनायक राऊत, तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि 'वंचित'कडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तिढा कायम आहे. काँग्रेस लोकसभेच्या २१ ते २३ जागा मागत आहे. यात नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील तेवढ्याच जागा मागत आहे. राष्ट्रवादीने ११ जागांची मागणी करत आहे. यातच वंचितचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे. यामुळे काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर अधिकच दावा प्रबळ केला आहे. या जागेची मागणी मुंबईतील बैठकीत काँग्रेसने लावून धरली. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गट ही जागा सोडण्यास तयार नाही. या जागेमुळे नगर दक्षिण मतदारसंघाच्या जागेचा विषय देखील ऐरणीवर आला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा मिळाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे गट लढण्यास तयार आहे, असे संकेत खासदार संजय राऊत यांनी नगर दौऱ्यात दिले आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा अधिकच वाढला आहे.

काँग्रेसने राज्यातील नगर जिल्ह्यातील शिर्डी, रामटेक, हिंगोली आणि मुंबईतील दोन जागांचा विषय लावून धरला आहे. वर्धा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. यातच काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला आहे. राखीव मतदारसंघ असल्याने शिर्डीसाठी देखील काँग्रेस आग्रही आहे. शिर्डी मतदारसंघ २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकला आहे. विद्यमान खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे येथील जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे सक्षम उमेदवाराच्या शोधात आहेत. मात्र महाविकास आघाडीतून काँग्रेसने या मतदारसंघावर दावा ठोकल्याने ही जागा कोणाला सुटणार याकडे लक्ष लागले आहे.

Mahavikas Aghadi
Anil Babar Passed Away:शिंदे गटातील आमदार अनिल बाबर यांचे निधन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com