Anil Babar Passed Away:शिंदे गटातील आमदार अनिल बाबर यांचे निधन

CM Eknath Shinde Group MLA Anil Babar Passed Away : खानापूर-आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते
Anil Babar
Anil Babar Sarkarnama
Published on
Updated on

Anil Babar Death: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. खानापूर-आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते. (MLA Anil Babar Passed Away)

काल (मंगळवारी) त्यांना न्यूमोनिया झाल्याने दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री आर. आर.पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय होते. अनिल बाबर यांच्या निधनाने आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. ते सलग 20 वर्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

"मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत," अशी प्रतिक्रिया त्यांनी शिंदे गटात जाताना दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली...

अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन, कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

अनिल बाबर ( खानापूर -आटपाडी आमदार )

  • 1972 सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य

  • 1981 बांधकाम विभाग सभापती

  • 1990 खानापूर पंचायत समिती सभापती

  • 1990 ला अपक्ष आमदार म्हणून निवडणून आले.

  • 1999 दुसऱ्यांदा आमदार अपक्ष (राष्ट्रवादीचा पाठींबा)

  • 1999 ते 2008 नॅशनल हेवी इंजिनियरिंगचे अध्यक्ष

  • 2014 व 2019 शिवसेनेच्या तिकिटावर आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com