Sangram Kote Patil : अजितदादांचा शिर्डीतील शिलेदार मैदानात; आमदार धस यांना सुनावत सांगितला इतिहास

Shirdi Sangram Kote Patil BJP MLA Suresh Dhas NCP President DCM Ajit Pawar Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यात टीका करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना संग्राम कोते पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर.
Sangram Kote Patil
Sangram Kote PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक आहेत. या हत्येप्रकरणात आमदार धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून याबाबत मंत्री मुंडेंबरोबर ते अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधत आहे. यामुळे आमदार धस राष्ट्रवादी काँग्रेसच्या रडारवर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या पाठोपाठ पक्षाचे शिर्डीतील युवा नेते संग्राम कोते पाटील यांनी देखील आमदार धस यांना सुनावलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील म्हणाले, "अजित पवार यांच्याविषयी भाजप (BJP) आमदार सुरेश धस जे काही विधान करत आहेत, ते चुकीचेच आहेत. यातून त्यांची दिशा भरकटलेली दिसते. अजितदादांविषयी करत असलेल्या विधानांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे". हत्येतील आरोपींना सोडणार नाही, असे आश्वासन, शब्द अजितदादांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांचा शब्द हा, काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. असे असताना आमदार धस अजितदादांविषयी करत असलेल्या विधानांचा निषेधच आहे, असे कोते पाटील यांनी म्हटले.

Sangram Kote Patil
Chhagan Bhujbal : 'पर्दे में रहने दो...'; पवारांच्या 'त्या' लेखी संदेशाला भुजबळांकडून 'राजकीय फोडणी'

संग्राम कोते पाटील यांनी आमदार धस यांना आपण देखील राष्ट्रवादीत (NCP) होता, याची आठवण करून दिली. त्यावेळी अजितदादांनी धस यांना बळ दिलं. काम करण्याची संधी दिली. यातून तुम्हीच मोठे झालात, असे असताना अजितदादांविषयी पुण्यातील मोर्चात चुकीचे विधानं केली, हे चुकीचेच आहे, असेही म्हटले.

Sangram Kote Patil
Bramhin Reservation : ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावर भाजप नेत्यांचं मोठं विधान

अजितदादा स्वतः मस्साजोग इथं जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. या कुटुंबियांना तिथं दिलासा देताना, या हत्येत असलेल्या आरोपींना कोणत्याही परिस्थिती सोडणार नाही. हत्यारांना पाठीशी घातलं जाणार नाही. आरोपी कोणीही असला, तर त्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार, असे असताना आमदार सुरेश धस ज्यापद्धतीने अजितदादांविषयी स्टेटमेंट करत आहेत, त्याचा निषेध करतो, असे संग्राम कोते पाटील यांनी म्हटले.

पुणे इथं रविवारी निघालेल्या मोर्चात अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना आमदार धस यांच्या तोंडातून ऐकरी उल्लेख झाला होता. त्यावर आमदार धस यांनी आज दोनदा माफी मागितली आहे. परंतु आमदार धस यांनी माफी मागितली असली, तरी ज्यापद्धतीने मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असतानाच, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विधान करत आहे, त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे आमदार धस यांच्याविषयी तक्रारी सुरू केल्या आहेत. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत धस यांची कानटोचणी देखील केली आहे. परंतु त्याचा फारसा असा काही फरक पडलेला दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com