Political News : ठाकरे गटाच्या नगरमधील शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या गटावर गेल्या काही दिवसापासून करण्यात येतो. काॅंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर देखील शिवसेना ठाकरे गटाने मात्र कडवे हिंदुत्व जपल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. नगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने कारसेवकांचा सत्कार करीत लक्ष वेधून घेतले आहे.
कारसेवकांच्या सत्कारावेळीच ठाकरे गटाच्या नगरमधील शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. उद्धव ठाकरेंचे सज्ज राहण्याच्या सूचना आहेत. आदेश येताच शिवसैनिक मैदानात असेल. मग समोर कोणीही असू, असे शिवसेना उपजिल्हा प्रमुख भगवान फुलसौंदर यांनी म्हटले आहे.
नगर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा कारसेवकांचा सत्कार केला. नगरमधील शिवालयात हा सत्कार कार्यक्रम झाला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख भगवान फुलसौंदर, युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, योगीराज गाडे, संजय शेंडगे उपस्थित होते. ज्येष्ठ शिवसैनिक तथा कारसेवक अंबादास पंधाडे, प्रा. मधुसूदन मुळे, वाल्मिक कुलकर्णी, अनिल सबलोक, नंदकुमार सुपेकर, सुभाष पाठक, विठ्ठल पाठक, मिलिंद गंधे, विनोद मुथा, सुरेश क्षीरसागर, कैलास दळवी, गोरख धोत्रे, गंगाराम हिरानंदाणी, अविनाश जिकरे, उल्हास ढोरे, अविनाश कांबळे, बबन आढाव या कारसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
भगवान फुलसौंदर म्हणाले, "हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, या धार्मिकस्थळी माझे सैनिक असतील, तर मला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे हे मंदिर कोणा एकट्या व्यक्तीचे नाही. संपूर्ण हिंदूराष्ट्राचे आहे. हिंदू धर्मियांचे आहे. भारतीयांचे आहे. नगर शहरातून ५० जणांनी कारसेवा बजावली होती. या कारसेवकांचा सन्मान प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून करण्यात आला".
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'श्रीराम मंदिरासाठी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान असल्याचे सांगून फुलसौंदर यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. शिवसैनिक पक्षाचा आदेशात त्यावर कामला लागतो. शिवेसना फुटली असली, तरी आम्ही सत्याच्या वाटेवर आहोत. ठाकरेंसोबत आहोत. शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. परंतु शिवसेनेचे (Shivsena) मतदार फुटलेले नाहीत. या मतदारांच्या जीवावर आमदार होता येते. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे हा मतदार ठामपणे उभा आहे. शिवसेना जागेवर आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आदेश येताच लोकसभेसाठी सज्ज राहू', असे भगवान फुलसौंदर यांनी म्हटले.
(Edited by: Sachin Waghmare)