Shivsena Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेंचा दुसरा नेता अडचणीत, विक्रम नागरेंचा माफीनामा पोलिस स्विकारतील का?

Shiv Sena leader Eknath Shinde in trouble, Vikram Nagare in police custody, wrote an apology letter -वादग्रस्त विक्रम नागरे यांनी नुकतेच भाजप पक्षातून शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करूनही ते पोलिसांच्या रडारवर
Vikram Nagre & Eknath shinde
Vikram Nagre & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई चर्चेत आहे. अनेक वादग्रस्त राजकीय नेते आणि भाई अडचणीत आले आहेत. यामध्ये आता शिवसेना शिंदे पक्षाचा दुसरा नेता अडकला आहे.

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी, खून आणि गुन्हेगारांची दहशत यामुळे सत्ताधारी भाजप अडचणीत आला होता. संदर्भात स्थानिक नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप झाला होता.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा अंदाज भाजपला आला. त्यामुळे नाशिकचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्याला बायपास करीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप केला. राजकीय गुन्हेगारांवर कारवाईचे स्वातंत्र्य पोलिसांना देण्यात आले.

Vikram Nagre & Eknath shinde
Voter List Controversy: निवडणूक आयोगाचा अनोखा भाईचारा; कांबळे, अभ्यंकर, पाटील असे 100 जण राहतात एकाच फ्लॅटमध्ये! मतदारयादीमुळे नवा वाद!

पोलिसांच्या या कारवाईत भाजपच्या तीन माजी आणि प्रमुख नगरसेवकांसह अनेक जण अडकले आहेत. तिच्या कारवाईने हवेत असलेले हे नेते सध्या जमिनीवर आले आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आहे.

Vikram Nagre & Eknath shinde
BJP old workers issue : नितीन गडकरीचं जुन्या कार्यकर्त्यांविषयी रोखठोक मत; मंत्री विखे पाटलांना नाही पटलं, मांडली थेट भूमिका

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या एका माजी नगरसेवकाला पोलिसांचा प्रसाद मिळाला. आता सातपूरच्या दुसऱ्या नगरसेवकावर पोलिसांची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक घरात असलेल्या या नगरसेवकांनी राजकीय नेत्यांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे.

विक्रम नागरे यांनी शहरात लावलेले फलक अडचणीचे ठरले आहेत. पोलिसांनी गुन्हेगार आणि हिस्ट्रीशीटर नेत्यांचे फोटो लावून दहशत निर्माण करणाऱ्या फलकांवर कारवाई केली. आता यामध्ये विक्रम नागरे हा देखील अडकला आहे.

या संदर्भात श्री नागरे यांनी माफीनामा लिहून देत नाशिककरांची जाहीर माफी मागितली आहे. "नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला" असे लिहून दिले. या संदर्भात पोलिसांकडून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम भरण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून शिवसेना शिंदे पक्षाचा दुसरा नेता पोलिसांना शरण गेला आहे.

पोलिसांची कारवाई होणार, या भीतीने श्री नागरे ऐन दिवाळीतच शहराबाहेर गेले आहेत. पोलिसांनी शोध घेऊनही ते सापडले नव्हते. आता त्यांनी माफी नामा लिहून देत पोलिसांची क्षमा याचना केली आहे. पोलीस काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

पोलिसांचा खाक्या पाहता नागरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापालिका निवडणुकीवर शहरातील गुन्हेगारीचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राजकीय नेते सावध झाले आहेत. कारवाई झालेल्यांना उमेदवारी मिळते की नाही याची आता चर्चा आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com