

Sangamner political news : नागपूर इथं भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षातील इनकमिंगवर बोलताना कान टोचले. सूचक असं अलर्ट देखील दिला. यावर अहिल्यानगरमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, नापसंती दर्शवली.
'नितीन गडकरी जेष्ठ नेते, मात्र त्यांच्या मताशी मी सहमत नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेला आहे', असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर इथं दिवाळी फराळाचा कार्यक्रमात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, नागपूर इथं भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची सूचक सूचना केली.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या या सूचनेवर मंत्री विखे पाटील प्रतिक्रिया देताना सहमती दर्शवली नाही. ते म्हणाले, "नितीन गडकरी जेष्ठ नेते, मात्र त्यांच्या मताशी मी सहमत नाही. जुन्या-नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेला आहे. नव्या जुन्याच्या समन्वयानेच भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळाले. नव्या-जुन्याचा मेळ घालूनच राज्यात पक्षाचा विस्तार होतो आहे."
'महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबई महापालिकेत भाजपची ताकद आहे. जो अनेक वर्षे मित्रपक्ष होता, त्याने पाठीत खंजीर खुपसला. त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे, असे म्हणत मुंबई महापालिकेत भाजप 150 पार होईल,' असे विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा आणि मराठी महापौर बसेल, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केलं. 'संजय राऊतांना कोंबड्यासारखी बांग देण्याचे काम दिलं आहे. रोज सकाळ झाली की बांग देतात, या पलीकडे त्यांची जास्त काही भूमिका नाही', असा टोला मंत्री विखे पाटलांनी लगावला.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले
पक्षात होणाऱ्या जोरदार इनकमिंग सोबतच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं सूचक वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथल्या कार्यक्रमात केले होते. पक्षातील नेत्यांचे एकप्रकारे त्यांनी कान टोचले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.