..गुलाबराव पाटील जेलमध्ये असते, ईडीला घाबरुन शिवसेना सोडली ; सावंतांचा टोला

Shiv Sena : "हे हिंदुत्व,शिंदे वैगेरे काही नाही ते त्यांचे सर्व थोतांड आहे. यांनी बेसुमार संपत्ती कमावली आहे.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : "जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) ईडी कारवाईला घाबरून शिवसेना सोडून गेले आहेत, ते तिकडे गेले नसते तर जेलमध्ये गेले असते," असा टोला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी लगावला आहे. (Gulabrao Patil latest news)

नशिराबाद येथे आयोजित सभेत बोलताना संजय सावंत बोलत होते. ते म्हणाले, "हे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत,हे जे गेलेत त्या दिवशी त्यांना दिल्लीला बोलाविले होते. घाबरत, घाबरत दिल्लीला गेले तेथून परत मुंबईत आले, फोन केला साहेब, मला अडचण आहे, मी थांबू शकत नाही मला नोटीस दाखवली आहे त्यामुळे मला थांबता येणार नाही, मग घाबरून ते पळाले आहेत,"

"हे हिंदुत्व,शिंदे वैगेरे काही नाही ते त्यांचे सर्व थोतांड आहे. यांनी बेसुमार संपत्ती कमावली आहे, त्याच्या चौकशीच्या भीतीने हे तिकडे गेले आहेत. तिकडे गेले नसते तर जेलमध्ये गेले असते.आम्हाला संजय राऊत यांचा अभिमान आहे. त्यांच्यावर ईडी ने खोट्या केसेस केल्या, हा योद्धा गेली दोन महिने झाले जेलमध्ये आहेत, मात्र ते म्हणतात मोडेन पण वाकणार नाही, हा खरा बाळासाहेबांचा खंदा शिवसैनिक आहे.राऊत म्हणतात, मला किती महिने जेलमध्ये ठेवता ते बघू दया, मात्र बाहेर आल्यावर या चाळीस जणांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही,"

Gulabrao Patil
Dasara Melava : मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचा सल्ला मानला असता तर त्यांची गोची झाली नसती !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा शनिवारी दिवसभर सुरु होती, त्यानंतर खडसेंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर लगेतच जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे कट्टर पदाधिकारी आमदार शिरीष चौधरी हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याला चौधरींनी सडेतोड उत्तर दिले आहे.

"माझ्या भाजप प्रवेशाबाबत विरोधकासह पक्षातील काही विष पसरविणारी माणसे आहेत, त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा चौकटीबाहेर जाऊन आपण त्यांना ठिकाणावर आणू ," असा इशारा काँग्रेसचे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी यांनी दिला आहे. जळगाव येथे काँग्रेस भवनात आयोजित पक्षच्या बैठकीत ते बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com