Shivendraraje Bhonsle: कंत्राटदाराने पत्रकारांच्या उपस्थितीतच क्लब टेंडरींगची टक्केवारीच सांगितली... बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले झाले अस्वस्थ

Shivendraraje Bhonsle Shocked as Contractor Reveals Tender Percentage: सिंहस्थ कुंभमेळ्यातील रस्ते व विकासकामांमध्ये क्लब टेंडरिंग होत असल्याने कंत्राटदारांची थेट बांधकाम मंत्र्याकडेच कैफियत.
Government Contractor with Shivendraraje Bhosale
Government Contractor with Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Kumbhmela News: सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांच्या कंत्राटांचा वाद वाढू लागला आहे. नाशिकच्या कंत्राटदारांनी हा विषय थेट बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडेच उपस्थित केला. यावेळी कंत्राटातील टक्केवारी उघडपणे मांडल्याने मंत्री देखील अस्वस्थ झाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यंदा अफाट खर्च केला जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून दोन हजार २०० कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांचा वाद गुरुवारी थेट बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला.

नाशिकच्या कंत्राटदारांची अस्वस्थता रणजीत शिंदे यांनी गुरूवारी बांधकाम मंत्र्यांपुढे व्यक्त केली. पत्रकार परिषद सुरू असतानाच श्री शिंदे यांनी क्लब टेंडरिंग मधील घोटाळा मांडला. त्यामुळे अस्वस्थ बांधकाम मंत्र्यांनाही पत्रकार उपस्थित असल्याने शिंदे यांचे म्हणणे ऐकावे लागले.

Government Contractor with Shivendraraje Bhosale
Sanjay Raut : 'कुंभमेळा येईल आणि जाईल, त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना उध्वस्त करू नका..'; 'एनएमआरडीए'च्या घरे पाडण्याच्या कारवाईवरून ठाकरेंचा नेता आक्रमक

राज्य शासनाने दोन हजार २०० कोटींच्या स्त्यांच्या निविदा काढल्या आहेत. या निविदा क्लब केलेल्या असल्याने लहान कंत्राटदाऱ्यांना त्यात भाग घेता आला नाही. या कामांमध्ये नाशिकच्या कंत्राटदारांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना आहे.

Government Contractor with Shivendraraje Bhosale
Malegaon Fake Currency Case : पोलिसांनी सहज हटकले अन् नकली नोटांचे घबाड हाती लागलं...

यावेळी शासकीय कंत्राटदार श्री शिंदे यांनी मोठे कंत्राटदार कामे घेतात. नंतर त्याचे सब टेंडरिंग करतात. पंधरा ते पंचवीस टक्के कामे अन्य लोक करतात. मग शासन त्यांना का डावलत आहे? या कंत्राटदारांपुढे गंभीर अडचणी असताना, यांची कोंडी का केली जाते? असा प्रश्न कंत्राटदार शिंदे यांनी केला.

यावेळी क्लब टेंडर मधील कामाच्या टक्केवारीचा विषय मांडताना कंत्राटदार शिंदे यांनी मी प्रांजळपणे आणि पुराव्यासह बोलतो आहे. जे बोलतो ते सिद्ध करून दाखवेन. सिद्ध न केल्यास वाटेल ती शिक्षा घेण्याची माझी तयारी आहे, असे आव्हान थेट बांधकाम मंत्र्यांना त्यांनी दिले.

गत सिंहस्थ कुंभमेळ्यातही कामे विभागून देण्यात आली होती. ती सर्व कामे गुणवत्ता पूर्ण होती. मग यंदाच मोठे टेंडर का काढले जात आहेत? हे टेंडर विभागून दिल्यास गुणवत्ता पूर्ण काम शंभर टक्के होणारच आहे, असा दावा त्यांनी केला.

यावेळी मंत्री शिवेंद्रराजे यांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. शासनाने काय निर्णय घ्यावेत, हे आम्हाला घेऊ द्या. 2200 कोटी रुपयांत एक नव्हे तर १८ टेंडर आहेत. परत ५७० कोटी रुपयांच्या निविदा येणार आहेत. त्यात लहान कामे असतील.

स्थानिक कंत्राटदारांना त्यात भाग घेता येईल. कंत्राटदारांचा विकास व्हावा, ही आमची देखील भूमिका आहे असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगित कंत्राटदाराचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र कंत्राटदार आणि मंत्री यांच्या थेट जुगलबंदी झाली. त्यात आमदार देवयानी फरांदे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकंदरच उपस्थित पत्रकारांना एक नवी बातमी मात्र मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com