Malegaon Fake Currency Case : पोलिसांनी सहज हटकले अन् नकली नोटांचे घबाड हाती लागलं...

Malegaon Fake Currency Case Police Seize Huge Cache of Counterfeit Notes: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपेक्षांना भाजपच्या ताब्यात असलेल्या राज्यातूनच हरताळ, वीस लाखांच्या बनावट नोटा जप्त!
Fake note seizure in Malegaon
Fake note seizure in MalegaonSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Crime News: नोटबंदी नंतर नकली नोटा बंद होतील ही अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. मात्र त्याला मध्य प्रदेश राज्यातच हरताळ फासल्याचे आढळले. नकली नोटांचे मध्य प्रदेश कनेक्शन उघड झाले आहे.

मालेगाव शहरात आलेल्या दोघांना गुरुवारी स्थानिक पोलिसांनी पाळत ठेवून हटकले. दोघा तरुणांची तपासणी केली असता पोलिसांनाही धक्का बसला. बनावट नोटांचा खजिनाच हाती लागला.

मुंबई (Mumbai) आग्रा महामार्गावर मालेगाव चौफुली इथं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघा संशयास्पद युवकांना हटकले. त्यांची तपासणी केली असता 20 लाख रुपयांच्या नोटा आढळल्या. तपासणीनंतर त्या बनावट असल्याचे आढळले.

मध्य प्रदेशातून यापूर्वी पोलिसांना (Police) देशी बनावटे पिस्तूल, गांजा आणि अमली पदार्थ आल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र आता बनावट नोटा आल्याने पोलिस सावध झाले आहेत. या नोटा मालेगाव शहरात कोणाकडे आणि कशासाठी जात होत्या याचा तपास सुरू आहे.

Fake note seizure in Malegaon
Eknath Khadse bungalow theft : खडसेंच्या बंगल्यातील चोरी प्रकरणात मोठी अपडेट; उल्हासनगर कनेक्शन अन् दोन सख्खे बंधू...

पोलिसांनी नजीर अक्रम मोहम्मद अन्सारी आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोघेही बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) इथले आहेत. मध्य प्रदेशातून बनावट नोटा घेऊन त्यांची मालेगावात विलेवाट लावण्यात येणार होती.

Fake note seizure in Malegaon
MNS exposes voter fraud : मतदार यादीत घोळावर-घोळ; आयुक्तांच्या निवासापाठोपाठ तलाठी मोबाईलवर 288 मतदार नोंदणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर नव्या नोटांची छपाई झाली. त्यामुळे दहशतवादी कारवाया आणि बनावट नोटा बंद होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता चक्क मध्य प्रदेश राज्यातूनच इतरत्र बनावट नोटा पाठविल्या जात असल्याचे आढळले आहे.

या दोन्ही तरुणांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे. जप्त केलेल्या बनावट नोटांची छपाई आणि त्या वितरण करणाऱ्या यंत्रणेचा छडा लावण्याचे काम सुरू आहे. याबाबत अटक केलेल्या तरुणांनी मध्यप्रदेश मधील व्यक्तीचे नाव सांगितल्याचे कळते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com