Effect Shivsena; शिवजयंती मिरवणुकीतून सहा मंडळांची माघार!

शिवजयंती मिरवणुकीला शहरात सुरवात झाली, शिवसेनेच्या पक्ष, चिन्हाच्या वादाने उत्साह फिका पडला
Shivjayanti Procession in Nashik
Shivjayanti Procession in NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) शहरात शिवजयंती (Chhatrapati Shivaji Maharaj) उत्साहात साजरी होत आहे. सायंकाळी निघणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकीवर मात्र शिवसेनेच्या (Shivsena) पक्ष व चिन्हाच्या घटनेचा परिणाम जाणवला. दहा चित्ररथांना परवानगी असताना सहा मंडळांनी माघार घेतली. त्यामुळे केवळ चारच चित्ररथांची मिरवणूक निघाली. (Shivsena symbol decision effect On Shivaji Maharaj Jayanti)

Shivjayanti Procession in Nashik
Eknath Shinde News; मुख्यमंत्र्यांची उत्तर महाराष्ट्रात राजकीय साखरपेरणी!

नाशिक शहरातील शिवजयंती यंदा अत्यंत उत्साहात सुरु आहे. विविध मंडळांनी अप्रतिम देखावे केले. त्याला पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, सुधाकर बडगुजर यांसह विविध नेते यांनी मंडळांच्या देखाव्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Shivjayanti Procession in Nashik
Shivsena Bhavan : बॉम्बस्फोट ते पक्षातील फूट... ; अनेक धक्क्यांचं साक्षीदार आहे 'शिवसेना भवन', एकदा वाचाच...

शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटासह सर्वच पक्षांच्या कार्यकर्ते नेत्यांसाठी तो चर्चेचा विषय होता. आज शिवजयंतीवर त्याचा परिणाम जाणवला. वाकडी बारव येथून निघणाऱ्या पारंपारीक व मानाच्या मिरवणुकीत दहा मंडळे सहभागी होणार होते. परंतु ऐनवेळी त्यातील सहा मंडळांनी माघार घेतल्याने केवळ चार मंडळे सहभागी झाले.

राणेनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पालकमंत्री दादा भुस, माजी नगरसेवक अमोल जाधव, संगीता जाधव यांनी अभिवादन केले. सह्याद्री युवक मित्र मंडळ आणि शिवसेना शिंदे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांचे आरती करण्यात आली. यावेळी मंडळातर्फे संपूर्ण चौकात छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांच्या चित्रमय प्रदर्शनाचे पालकमंत्री भुसे यांनी कौतुक केले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र आदरांजली दिली. तसेच उपस्थितांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, भालचंद्र भुजबळ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com