Nashik Shivsena Politics : ठाकरेंची खेळी...तांबेंना करावा लागणार शुभांगी पाटलांचा प्रचार!

Shivsena Deputy Leader Shubhangi Patil Will Fight in Teachers Constituency - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नवी जबाबदारी दिलेल्या शुभांगी पाटील यांनी सुरू केली शिक्षक मतदारसंघाची तयारी.
Shubhangi Patil & Dr. Sudhir Tambe
Shubhangi Patil & Dr. Sudhir TambeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Shivsena News : पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांना अयशस्वी आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी शिवसेनेत नवी जबाबदारी स्वीकारताच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. (Shivsena Dy. Leader Shubhangi Patil will be Candidate for Nashik Teachers constituency)

शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुभांगी पाटील यांच्यावर नुकतीच उपनेते ही नवी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा (Maharashtra) दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shubhangi Patil & Dr. Sudhir Tambe
Eknath Shinde Nandurbar Politics : शिंदेंनी नंदुरबारला एका दगडात तीन पक्षी मारले !

जबाबदारी दिली तर निवडणूक लढवेन

याबाबत त्यांनी आज ‘सरकारनामा’ला ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, मी एक सामान्य कुटुंबातील महिला आहे. पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी सार्थ ठरविण्यासाठी मी जनसंपर्कावर भर देणार आहे.

विधिमंडळात शिक्षकांचा आवाज जोरकसपणे मांडण्यासाठी मी यापुढील काळात काम करणार असून, विधान परिषदेची नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा माझा निर्धार आहे. पक्षाने विश्वास टाकल्यास मी नक्कीच शिक्षक मतदारांचा कौल घेईन, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती पाटील यांनी यापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते तसेच अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारी म्हणून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली होती.

त्यात सत्यजित तांबे विरुद्ध आघाडीच्या पाटील असा सामना रंगल्यावर तांबे विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पाटील यांनी ऐनवेळी उमेदवारी करीत अतिशय जोरदार लढत दिली होती. आता त्यांच्यावर शिवसेनेने उपनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

काँग्रेसने बडतर्फे केलेले माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने पुन्हा दरवाजे उघडले आहेत. ते लवकरच काँग्रेस प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पदवीधर निवडणुकीत परस्परांच्या विरोधात लढलेल्या तांबे व पाटील महाविकास आघाडीच्या एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्यात कदाचित तांबे यांना शुभांगी पाटील यांच्यासाठी शिक्षक मतदारांना आवाहन करावे लागेल, अशी स्थिती आहे.

Shubhangi Patil & Dr. Sudhir Tambe
MLA Disqualification News : आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणात मोठी अपडेट; राहुल नार्वेकर घेणार 'ही' भूमिका ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com