Eknath Shinde Politics: महत्त्वाकांक्षी नेत्यांचा प्रवेश ठरणार एकनाथ शिंदे, भाजप नेत्यांतील कोल्डवॉरचे निमित्त?, हे आहे कारण!

Eknath Shinde; Cold war between Shivsena Eknath Shinde and BJP in the backdrop of the municipal elections?-आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना ठरणार कळीचा मुद्दा
Girish Mahajan & Eknath Shinde
Girish Mahajan & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena Shinde News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात अनेक इच्छुक प्रवेश करीत आहे. हे प्रवेश आगामी काळात दोन्ही पक्षांना डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचना हा प्रशासकीय विषय आहे. मात्र शत प्रतिशत भाजपची घोषणा असल्याने त्यात प्रभाग रचना निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकू शकतो. शिवसेना एकनाथ पक्षाचे पदाधिकारी त्याबाबत कामाला लागले आहेत.

विविध इच्छुक सध्या महापालिका निवडणुकीचे आडाखे बांधण्यात व्यस्त आहेत. यामध्ये सोयीची प्रभाग रचना हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सत्ताधारी पक्षात जाऊन सोयीचे प्रभाग रचना करून घेण्यासाठी या माजी नगरसेवकांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यांच्या अपेक्षा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी वाढल्या आहेत.

Girish Mahajan & Eknath Shinde
BJP Angry on Eknath Shinde: भाजपचा संताप, प्रवेश करणाऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाची तिजोरी उघडली!

प्रभाग रचना कोणाच्या सोयीची करायची? हा गंभीर पेच प्रशासन आणि शासनाकडे असेल. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यासाठी आतापासून फिल्डिंग लावून आहेत. महापालिकेतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळपास 33 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे.

Girish Mahajan & Eknath Shinde
BJP Angry on Eknath Shinde: भाजपचा संताप, प्रवेश करणाऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाची तिजोरी उघडली!

भारतीय जनता पक्षाने देखील सर्व पक्षांच्या असंतुष्ट आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना मधाचे बोट लावले आहे. भारतीय जनता पक्षात ज्येष्ठ नगरसेवकांची फळी आगामी निवडणुकीच्या बारीक-सारीक तयारीत व्यस्त आहे. त्यात त्यात भाजपला सोयीची प्रभाग रचना यावर ज्येष्ठ नगरसेवकांनी अभ्यास केला आहे.

भाजपला सोयीची प्रभाग रचना करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे इच्छुकांच्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे इच्छुक उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. या स्थितीत प्रशासनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापैकी कोण प्रभाव टाकण्यात यशस्वी होते याची उत्सुकता आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाग रचना हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या प्रभाग रचना शिंदे गटाच्या सोयीच्या की भाजपच्या इच्छेनुरूप होतात. यावरून सत्ताधारी दोन्ही पक्षांतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे प्रवेश सोहळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री महाजन यांच्यात नव्या शीतयुद्धाचे कारण ठरण्याची चिन्हे आहेत.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com