Eknath Shinde Faction: एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता; महापालिका निवडणुकीत भाजप ऐनवेळी शिंदे पक्षाला वाऱ्यावर सोडणार?

BJP's strategy for municipal elections in Maharashtra: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केल्या भाजप विषयी गंभीर तक्रारी.
Devendra Fadanvis |Eknath Shinde
Devendra Fadanvis |Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Vs BJP News: आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यात भाजपने सहकारी शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाही मागे सोडले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच घटक पक्ष जोरदार तयारी करीत आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सत्तेत येण्याचे वारंवार जाहीर केले आहे. त्या दृष्टीने अनेकांना पक्षप्रवेश दिला जात आहे. त्यामुळे सहकारी पक्षांची नाराजी लपून राहिलेली नाही.

शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी नाशिकला झाली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचा आक्रमक पक्ष विस्तार आणि स्वबळावर सत्तेत येण्याच्या घोषणा याचे पडसाद उमटले. भाजपची स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल का? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला.

Devendra Fadanvis |Eknath Shinde
Uddhav Thackeray Politics: शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक, सरकारचे दहा मंत्री डागाळलेले, त्यांना घरचा रस्ता दाखवा!

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील सहकारी भाजप विषयी अनेक तक्रारी या बैठकीत केल्या. महापालिका निवडणुकांसाठी महायुती होणार की नाही याबाबतचे स्पष्ट आश्वासन मिळाले पाहिजे.

भाजपची स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यांच्या नेत्यांची वक्तव्य विचारात घेतल्यास भाजप (BJP) सहकारी पक्षांना बरोबर घेणार नाही अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना असल्याचे यावेळी मांडण्यात आले.

कार्यकर्त्यांचा तक्रारीचा सूर लक्षात घेता नेत्यांनीही पदाधिकाऱ्यांना खडसावले. आपल्याला स्वबळावर निवडणुकीची तयारी करायची असल्यास आपले सभासद किती याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक लाख सभासद नोंदणी करावी. तसे झाल्यास भाजप स्वतःहून आपल्याकडे युतीसाठी येईल, पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी यावेळी सांगितले.

उद्योग मंत्री उदय सामंत उपनेते राहुल शेवाळे सचिव भाऊसाहेब चौधरी संजय मोरे यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाची स्वबळाची तयारी सुरू आहे त्यामुळे राज्यात भाजपच्या भरवशावर राहू नका.

आपणही स्वबळाची तयारी सुरू करा. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी वेळीच कामाला लागावे. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी युती करण्याबाबत चाचपणी केली जाईल, असे नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com