शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हावे!

शिवसेना नेते रवींद्र सुर्वे यांच्या उपस्थितीत मध्य नाशिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Ravindra Surve, Shivsena leader.
Ravindra Surve, Shivsena leader.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक - आगामी महापालिका निवडणूक (NMC) व पक्षीय (Shivsena) कामकाजाचा आढावा घेण्यास आलेले मध्य नाशिक विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र सुर्वे (Ravindra Surve) यांनी शिवसेना व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची शालिमार कार्यालयात बैठक घेऊन निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांना केले. (Shivsena workers should be alert regarding NMc election)

Ravindra Surve, Shivsena leader.
निवडणूक ‘मविप्र’ संस्थेची, चर्चा मात्र राज्यपातळीवर

यावेळी शिवसेनेचे मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, उपमहानगरप्रमुख शशिकांत कोठुळे, संघटक रविद्र जाधव, महिला आघाडी विधानसभा संघटक फैमिदा रंगरेज, श्रध्दा कोतवाल आदी होते.

Ravindra Surve, Shivsena leader.
नितीन गडकरी नाशिकला बोलले ते तंतोतंत खरे ठरले!

यावेळी श्री सुर्वे म्हणाले, आपल्यासाठी कसोटीचा काळ असला तरी सर्वाना एकजुटीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.

शहरातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची एकहाती सत्ता निश्चितच येईल.

या बैठकीस वैभव खैरे, दत्ता दंडगव्हाळ, विरेंद्रसिंग टीळे, उमेश चव्हाण, नाना काळे, विनोद नुनसे, संजय परदेशी, आशिश साबळे, राजू थेटे, प्रमोद नाथेकर, राजू राठोड, शाम कंगले, अरुण सैंदाणे, आमित कंटक, माजीद पठाण, शारदा टिळे, शुंभागी देशमुख, आरती महाले, आंजुम शेख, निलोफर शेख, स्वाती महाले, शाखाप्रमुख गोविंद काकंरिया, कामरान सैय्यद, झुल्फिकार शेख, शेरुभाई शाहा आदी उपस्थित होते

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com