

लखमापुर : दिंडोरी (Nashik) तालुक्यात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला (Uddhav Thackrey) गळती लागली आहे. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb choudhary) यांच्याबरोबर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांनीही शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केल्याने दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे (Jayant Dinde) यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
दिंडोरीतील महत्त्वपूर्ण बैठकीस माजी आमदार धनराज महाले व माजी आमदार रामदास चारोस्कर अनुपस्थितीत राहिल्यामुळे जयंत दिंडे यांनी त्यांच्या अनुपस्थिती बद्दल नाराजी व्यक्त केली. तालुक्याची ठाकरे गटाची बैठक घेत शिवसेनेची अस्मिता नाही तर महाराष्ट्र वाचविण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले.
यावेळी मागील काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पदे भोगलेल्या यांनी पक्षाशी गद्दारी केली. निवडणूका आल्या की तिकिटासाठी गर्दी करणारे आज पक्षाच्या बैठकीला पाठ दाखवितात. याला तालुक्यातील शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला.
शिवसेना नेते जयंत दिंडे यांनी शिवसैनिकांना शांत करत जाणाऱ्यांना नक्कीच पश्चात्ताप होईल आणि परत येतील असा विश्वास व्यक्त केला. जे सोबत आहेत, त्यांना घेऊन शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा उभी करू, असे म्हणत गट,तट, रुसवे, फुगवे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना थारा देवू नका अशी मागणी केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, जिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, नाना मोरे, तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, जयराम डोखळे, अॅड. विलास निरघुडे, उत्तम जाधव, वसंत घडवजे, विश्वास गोजरे, रावसाहेब जाधव, प्रभाकर जाधव, विजय पिंगळ, अविनाश वाघ, अरुण गायकवाड, देवेंद्र धात्रक, पुंडलिक अपसुंदे, सुनील मातेरे, किरण कड, माणिकराव उफाडेआदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदारांची बैठकीला दांडी
दिंडोरीतील महत्त्वपूर्ण बैठकीस माजी आमदार धनराज महाले व माजी आमदार रामदास चारोस्कर अनुपस्थितीत राहिल्यामुळे जयंत दिंडे यांनी त्यांच्या अनुपस्थिती बद्दल नाराजी व्यक्त केली. माजी आमदार यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहायला पाहिजे होते अशी अपेक्षा व्यक्त केली. तर उपस्थित शिवसैनिकांनी जिल्हाध्यक्ष देताना तो जनमानसातील चेहरा असावा व त्याची ओळख संपूर्ण जिल्हाभर असावी अशी मागणी करत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव व माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांच्या नावाची शिफारस केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.