अनेक सभा घेऊनही निवडणुकीत राज ठाकरेंचे गुणपत्रक कोरेच ; गुलाबराव पाटलांचा टोला

राज ठाकरे हे कोणाचे एजंट आहेत सर्व जनतेला माहीत आहे.
Gulabrao Patil, Raj Thackeray
Gulabrao Patil, Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

जळगाव : "सभा घेणं हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा छंद आहे,मात्र त्या सभेचा त्यांना कोणताही फायदा होत नाही, ते केवळ एजंट म्हणून काम करतात," असा टोला शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "राज ठाकरे यांना सभा घेण्याचा छंद आहे, मात्र त्यांना यश मिळत नाही,अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण पडले तर त्या अभ्यासला अर्थ आहे, अनेक सभा घेऊनही निवडणुकीत त्यांचे गुणपत्रक कोरेच असते, त्यांच्याकडे एकही पालिका नाही,त्यांचा केवळ एक आमदार आहे. त्यामुळे त्यांच्या सभेने काहीही फरक पडणार नाही. त्यांचे अकाऊंट कोरेच आहे बिना पैशाचे अकाउंट दाखविण्यात काहीही अर्थ नाही,जनतेने त्यांना यश दिले पाहिजे,"

Gulabrao Patil, Raj Thackeray
आम्ही बनावट अन् नकली हिंदुत्ववाद्यांना पोसलं ; मुख्यमंत्री ठाकरेचं टीकास्त्र

"राज ठाकरे हे कोणाचे तरी एजंट म्हणून काम करतात,ते आता कोणाचे एजंट आहेत सर्व जनतेला माहीत आहे, दर पाच वर्षांनी त्यांची भूमिका बदलत असते.पहिली भूमिका काय? पक्ष स्थापनेची भूमिका काय ? झेंड्याची भूमिका काय ? आता तर झेंड्यात इंजन घुसले आहे. स्वतःच्या पक्षाची भूमिका बद्दलवितो त्या माणसाला यश मिळत नाही,ते मिळविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे," असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला.

Gulabrao Patil, Raj Thackeray
ED ची मोठी कारवाई ; अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा अडचणीत

हजारों कार्यकर्त्यांसह राज ठाकरे हे आज औरंगाबाद येथील सभेसाठी रवाना झाले आहेत. पुण्यात त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर काही गुन्हे दाखल झाले तर मनसैनिकांना संरक्षण देण्यासाठी दोन हजार वकीलांची फौज तयार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तीन मेला होणाऱ्या महाआरतीसाठी मनसेकडून वकील नेमण्यात आले आहेत.औरंगाबादला रवाना होण्याआधी पुण्यात आज सकाळी त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशीर्वाद असा धार्मिक कार्यक्रम झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com