शिवसेनेने खेळला पहिला डाव : १६ बंडखोरांना नोटिसीची गुगली; टोलवणार की विकेट पडणार?

Shivsena | Uddhav Thackeray | : सर्व बंडखोर आमदार कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत
Shiv Sena's Rebel MLAs in Guwahati
Shiv Sena's Rebel MLAs in GuwahatiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह गेलेल्या बंडखोरांविरोधात शिवसेनेच्या (Shivsena) पहिला डाव खेळला आहे. ‘अपात्र का करण्यात येऊ नये,’ अशा आशयाच्या नोटिसा बंडखोर शिंदे गटाच्या १६ आमदारांना उपाध्यक्षांकडून देण्यात आल्या असून, त्यांना ४८ तासांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत पक्षादेश बजावला होता. या बैठकीला बंडखोर आमदार अनुपस्थित राहिले. त्यांना पक्षाच्या वतीने खुलासा करण्याबाबत यापूर्वीच कळविण्यात आले होते. मात्र, त्यांनी केलेले खुलासे पक्षाच्या नेत्यांना पटणारे नसल्याने त्यांच्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांकडे शिवसेना पक्षाच्या वतीने गुरुवारी याचिका करण्यात आली. (Eknath Shinde latest news)

याद्वारे १२ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी केली. यावर विधानसभा उपाध्यक्षांनी आज शिवसेना नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील प्रभू आणि अजय चौधरी उपस्थित होते. (Maharashtra Political Crises)

यावर बोलताना माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, सर्व बंडखोर आमदार कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांना आता कायद्याने वेगळा गट स्थापन करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी प्रहारमध्ये जावं अन्यथा भाजपमध्ये जावं. कमळा बाईकडे गेला तर कायम तुम्ही भगव्याला मुकला हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे १६ आमदारांवर ही कारवाई होणार आहे. उपाध्यक्षांना आम्ही पत्र दिलं होतं, आज त्यांना आम्ही सर्व समजून सांगितल आहे. आम्ही आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलं आहे. आता त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com