'चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे आमदार त्याचे सर्टिफिकेट खडसेंनी देऊ नये'

एकनाथ खडसे (Chandrkant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) आमदार चंद्रकात पाटलांवर (Chandrkant Patil) टीका केली होती.
NCP leader Eknath Khadse & Shivsena leader Gulabrao Patil

NCP leader Eknath Khadse & Shivsena leader Gulabrao Patil

Sarkarnama

Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यास शिवसेना नेत्यांना जबाबदार धरत सातत्याने त्यांच्याकडून टीका केली जात आहे. यावर आता शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलांनी (Gulabrao Patil) त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

<div class="paragraphs"><p>NCP leader Eknath Khadse &amp; Shivsena leader Gulabrao Patil</p></div>
चंद्रकांतदादांचा नवा बॉम्ब : सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ!

रोहिणी यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत हा कसला शिवसेनेचा आमदार? असे ते म्हटले होते. त्याच्या या वक्तव्याचा समाचार घेत पाटलांनी 'चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे आमदार आहेत त्याचे सर्टिफिकेट खडसेंनी देऊ नये. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कोण कोणत्या पक्षात होते आणि पक्ष सोडून आता कोणत्या पक्षात आहे हे सार्‍या जगाला माहिती आहे, असा उलट टोला त्यांनी खडसेंना लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, कोण कोणत्या पक्षाचा हे बघण्यापेक्षा तो महाविकास आघाडीचा आमदार आहे हे महत्त्वाचे असे पाटील म्हणाले. खडसे हे स्वत: आघाडीचे नेते आहेत. इतक्या पुढे गोष्टी जाऊ नयेत याची काळजी त्यांनी आधीपासूनच घ्यायला हवी होती. आमचेही विरोधक जिल्ह्यात आहेत. आम्हीही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतो दोन्ही बाजूंकडून गोष्टी समजुतीने घेतल्या पाहिजेत, पण इतक्या खालच्या पातळीवर कोणी जात नाही. असा टोला त्यांनी खडसेंना लगावला.

<div class="paragraphs"><p>NCP leader Eknath Khadse &amp; Shivsena leader Gulabrao Patil</p></div>
Abdul Sattar : रावसाहेब दानवेंनी माझ्याशी गद्दारी केली, त्याची शिक्षा योग्यवेळी देईन..

'रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्हच आहे. मात्र, जोपर्यंत या हल्ल्याची पूर्ण चौकशी ही पोलिसांकडून होत नाही, तोपर्यंत आरोप करणे चुकीचे आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकार्‍याकडून नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी खुद्द स्थानिक आमदारांनी केली आहे. त्यामुळे चौकशीतून 'दूध का दूध पानी का पानी' समोर येईलच. यामध्ये जो कोणी दोषी असेल, तो मग आमच्या पक्षाचा असला तरी हयगय केली जाणार नाही. मात्र, चौकशी होईपर्यंत खडसे कुटुंबीयांनी शिवसेनेला बदनाम करू नये, असे पाटलांनी त्यांनी सुनावले.

दरम्यान रोहिणी खडसेंवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर शिवसेना आणि खडसे कुटुंबीयांमध्ये चांगलीच जुंपली आहे. याप्रकरणी सातत्याने जळगाव शिवसेना पदाधिकारी आणि खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. या हल्ल्याप्रकरणी खडसे कुटुंबीयांनी थेट शिवसेनेला व शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांना जबाबदार धरले जात आहे. मात्र, खडसेंच्या या आरोपांना पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com