इगतपुरी : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध आणि महिलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी माजी आमदार निर्मला गावित, (Ex MLA Nirmala Gavit) जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित (ZP member Nayna Gavit) सरसावल्या आहेत. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील १०१ ठिकाणी सुसज्ज वाचनालय असावे, अशी या मागची मूळ संकल्पना आहे.
या संकल्पनेनुसार १०१ ठिकाणी सर्व पुस्तकांचे कपाट, टेबल, खुर्ची आदी साहित्य देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित गावकऱ्यांनी अथवा पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी आमदार निर्मला गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांनी १०१ वाचनालये या संकल्पनेबाबत अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या, की विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अनेक संदर्भ असणाऱ्या पुस्तकांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. यासाठी होणारा खर्च आणि सुविधा गावांमध्ये नसते. वयोवृद्ध नागरिकांना मनोरंजन करण्यासाठी अनेक पुस्तके हवी असतात. महिला आणि मुलींनाही विविध विषयांवरील पुस्तके हवी असतात. मात्र, आपापल्या गावात पुस्तके मिळणे अवघड असते. या पार्श्वभूमीवर १०१ ठिकाणी आवश्यक आणि उपयुक्त पुस्तकांनी सुसज्ज असे छोटेसे वाचनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी पुस्तकांनी भरलेले कपाट, टेबल, खुर्ची दिल्या जाणार आहेत. वाचनालये या योजना राबविण्यासाठी गावातील पदाधिकारी अथवा इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारी घेतली पाहिजे, एवढीच नाममात्र अपेक्षा आहे. जे लवकर संपर्क करतील, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत इच्छुक असणाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित (७३८७१२७१११), रमेश आचारी (७७७६९५५०६३), हरसूल- त्र्यंबकेश्वर भागासाठी रमेश भोये (७८२०८९९३९०) या क्रमांकांवर आठ दिवसांत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
स्पर्धा परीक्षा पुस्तके, विज्ञानविषयक गोष्टी, प्रेरणादायी विचार, कथा-कादंबऱ्या अशा विविध विषयांची पुस्तके वाचली जावी, अशी मूळ संकल्पना आहे. यासाठी ग्रंथपाल म्हणून गावातील स्वयंसेवक नियुक्त करावे लागतील. या संकल्पनेतून विविध विषयांची पुस्तके दिली जातील. नागरिकांनी याचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा.
- निर्मला गावित, माजी आमदार, इगतपुरी- त्र्यंबकेश्वर
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.