Sadhvi Pragya Singh Thakur : मोठी बातमी! बॉम्बस्फोट प्रकरणाची पार्श्वभूमी; भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह 'या' कारणासाठी मालेगावाला जाणार

Mumbai High Court Sadhvi Pragya Singh Thakur Hindu Literary Conference Malegaon : मालेगाव इथं होणाऱ्या हिंदू संत साहित्य संमेलनास स्वाधी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उपस्थित राहण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी.
Sadhvi Pragya Singh Thakur
Sadhvi Pragya Singh ThakurSarkarnama
Published on
Updated on

Hindu Literature Event : नागपूर दंगलीचे कारण देत, गुढीपाडव्याला रविवारी (ता. 30) होत असलेल्या मालेगाव इथं होणाऱ्या हिंदू संत साहित्य संमेलनास आणि भाजपच्या माजी खासदार अन् मालेगाव बाॅम्बस्फोटातील मुख्य आरोपी स्वाधी प्रज्ञासिंह ठाकूर यांना महाराष्ट्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

परंतु हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने स्वाधी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उपस्थितीसह हिंदू संत साहित्य संमेलनास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. यासाठी काही अटी न्यायालायने घातल्या आहेत.

गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने मालेगाव इथं दरवर्षी हिंदू संत साहित्य संमेलन होते. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून हिंदुत्वावादी (Hindu) संघटना आक्रमक आहेत. यातून नागपूर इथं दंगल झाली. यातच हिंदुत्वावादी संघटनांनी मालेगाव इथं गुढीपाडवा मराठी वर्षानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे हिंदू संत साहित्य संमेलन आयोजित केले.

Sadhvi Pragya Singh Thakur
Shivsena vs BJP : ठाकरेंच्या पठ्ठ्यानं टायमिंग साधलं, फडणवीसांचा जुना व्हिडिओ काढला बाहेर

या संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाधी प्रज्ञासिंह ठाकूर यांना बोलवण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र पोलिसांनी नागपूर (Nagpur) दंगलीचे कारण देत स्वाधी प्रज्ञासिंह ठाकूर यांना परवानगी नाकारली. यातच स्वाधी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मालेगाव बाॅम्बस्फोटाची पार्श्वभूमी आहे. यामुळे हिंदू संत साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी न्यायालयात धाव घेतली.

Sadhvi Pragya Singh Thakur
Top Ten News : 'आता हे राक्षसाप्रमाणे बोलू वागू...', फडणवीसांचा जुना व्हिडिओ काढला बाहेर...- वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

स्वाधी प्रज्ञासिंह यांच्या उपस्थितीकडे लक्ष

मालेगावात होणाऱ्या हिंदू संत साहित्य संमेलनास व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उपस्थित राहण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची पार्श्वभूमी असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिंदू संत साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याने संमेलनास विशेष महत्त्व आले आहे.

न्यायालयाच्या आयोजकांना घातल्या अटी

न्यायालयाने हिंदू संत साहित्य संमेलनाला परवानगी देताना आयोजकांना काही अटी घातल्या आहेत. यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. प्रक्षोभक भाषण केले जाणार नाही. तसेच 5 वाजेच्या आत कार्यक्रम संपवण्याची हमी आयोजकांनी पोलिसांना लेखी स्वरूपात द्यावेत, असं निर्देश आहेत.

समाजवादी पक्षाचा विरोध

मालेगाव येथे होणाऱ्या हिंदू संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह यांना हिंदू वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संत-मुनींनी संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले असल्याचा दावा आयोजकांनी केला असला, तरी आता हिंदू संतांच्या उपस्थितीबाबत साशंकता आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यामालेगाव 2008 च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. हा बॉम्बस्फोट रमजान महिन्यात झाला होता. रमजानच्या काळात मालेगावमध्ये ही सभा होत असल्याने समाजवादी पक्षाने विरोध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com