
Ahilyanagar Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. महायुतीची भाषा करताना, मित्रपक्ष स्वबळाची देखील तयारी करत आहेत. स्थानिकसाठी टार्गेट निश्चित करत आहेत. पक्षप्रवेश घडवून आणले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना जिल्हानिहाय जबाबदाऱ्या दिल्या असून, संपर्कप्रमुख मंत्री शंभूराज देसाई शनिवारी (ता. 7) अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या या दौऱ्यात राहुरी, श्रीगोंदा आणि पाथर्डीतील आजी-माजी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री शंभूराज येतील अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा सुपडा साफ करतील, अशी चर्चा आता आहे.
विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब (Uddhav Thackeray) ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मोठी गळती लागली. भाजप अन् शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक ठाकरे सेनेला टार्गेट करत, आजी-माजी पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणले. भाजप आणि शिवसेना मंत्री ठाकरे सेना लवकर रिकामी होणार, अशी विधान करत आहेत.
नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर भाजपमध्ये (BJP) प्रवेशाच्या तयारी असतानाच, शिवसेना ठाकरे सेनेचे लवकर पाच खासदार फुटणार, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर मंत्री शंभूराज देसाई येत असून, यात अहिल्यानगर शहर, राहुरी, श्रीगोंदा आणि पाथर्डीतील आजी-माजी नगरसेवक अन् पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याचे नियोजन आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी देखील तसे नियोजन केले असून, ठाकरे सेनेचा या तिन्ही तालुक्यातून सुपडा साफ करायचाच, असे सध्यातरी नियोजन केले आहे.
शिवसेना शिंदे पक्षाचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिकसाठी इच्छुकांची मोठी गर्दी असणार आहे. एकनाथ शिंदे यांची राज्यपातळीवर 'स्थानिक'बाबत जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुतीकडून की स्वबळावर लढायची, याच्या स्पष्ट सूचना नाहीत. पण सर्व तयारीच्या सूचना आहेत. ऐनवेळी स्वबळाचा नारा झाल्यावर तर तसे सर्व प्रयत्न असणार आहेत. महायुतीमधील संकेतानुसार मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकमेकांच्या पक्षात प्रवेश होणार नाही, असे सचिन जाधव यांनी स्पष्ट केले.
श्रीरामपूरमधील माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांचा एकत्रित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थित ठाणे इथं पक्षप्रवेश होणार आहे. मुरकुटे हे पूर्वीचे शिवसैनिक आहेत. त्यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. छल्लारे यांनी शिवसेना ठाकरेंकडून 'मातोश्री'वर 'शिवबंधन' बांधले होते. त्यांनी ते सोडत शिवसेना शिंदे यांच्याबरोबर जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.