Narendra Darade : भुजबळसाहेब, १५ कोटी घेतले, एक रुपया तरी परत केला का?

Narendra Darade's alligation against Chhagan Bhujbal: शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळ यांना थेट आव्हानच दिले.
Narendra Darade & Chhagan Bhujbal
Narendra Darade & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: मी ओरीजनल शिवसैनीक आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसैनीक आहे. मला लुळा खुळा समजू नका. माझ्या शेपटावर पाय देऊ नका. उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. ( Narendra Darade warns Chhagan Bhujbal for baseless alligation)

येवला (Yeola) बाजार समितीची निवडणूक (APMC Election) चांगलीच रंगात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

Narendra Darade & Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal On Darade : आमदार दराडे यांनी स्वतः उमेदवारी का नाही केली?

येवला बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी येवल्यात सभा घेतली. त्यात त्यांनी माझ्यावर आरोप केले. शेतकरी विकास पॅनल आणि समर्थ पॅनल यामध्ये लढत आहे. त्या पॅनल व प्रचाराऐवजी भुजबळ यांनी जिल्हा बँक दराडे बंधुंनी बुडवली असे विधान केले.

आमदार दराडे म्हणाले, मी त्यांना सांगू इच्छीतो की, महाराज आम्ही जिल्हा बँक बुडवली नाही. आम्ही आर्मस्ट्राँग कंपनीसाठी भुजबळ यांना १५ कोटी रुपये कर्ज दिले होते. आजपर्यंत तुम्ही एक रुपया देखील परतफेड केलेली नाही. ४० कोटींची तुमच्यावर थकबाकी आहे. अशा तुमच्यासारख्या बलाढ्य लोकांनी जिल्हा बँकेला बुडवले आहे. गोरगरीब, शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही.

Narendra Darade & Chhagan Bhujbal
Nandgaon APMC election : समीर भुजबळ आमदार सुहास कांदे यांची कोंडी करतील?

ते म्हणाले, तुम्ही मला म्हाडाचा विभागीय अध्यक्ष गेले. त्यात काहीही उपकार केले नाही. मी दहा, पंधरा वर्षे तुमच्याबरोबर होतो. इतर लबाड व लुच्चे लोकांसारखे कधी एक रुपया तुमचा मी वापरला नाही. आज तुमच्याकडे विक्री करणारे लोक आले आहेत. मी शिवसेनेचा नाही, असे तुम्ही म्हणता. माझे तुम्हाला जाहीर आव्हान आहे, मी ओरीजनल शिवसेनेचा आहे.

उद्धव ठाकरे गटाचा मी आहे. माझा मुलगा अत्यंत कमी वयात जिल्हाप्रमुख आहे. मी येवल्याचा भूमीपुत्र आहे. बाजार समितीत गेल्या पंधरा वर्षात पाय तरी दिला का?. आता म्हणताहेत मी विकास करीन. आम्ही काही दुधखुळे नाही. आमच्या शेपटावर पाय देऊ नका. आम्ही देखील काही लुळेखुळे नाही. उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही. (Political Breaking News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com