Dada Bhuse Surprise Visit in School: शाळेचा पहिला दिवस शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्साहात झालेल्या स्वागताने स्मरणात राहणारा ठरला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे विविध शाळांत विद्यार्थ्यांच्या स्वागताला गेले. यावेळी काही त्रुटीही आढळल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
शाळेचा पहिला दिवस असल्याने शासनाने विविध आदेश काढले. त्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचे सावगत करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे अनेक भागात लोकप्रतिनिधींनी विविध शाळांत हजेरी लावत हा दिवस उत्साहात साजरा केला. ठिकठिकाणी वाजत गाजत मिरवणूकाही काढण्यात आल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या मतदारसंघातील दुर्गम भागातील शाळेला भेट दिली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गोंदे (इगतपुरी येथील निवासी आश्रमशाळेला भेट दिलीय त्यामुळे मंत्र्यांचे दौरे चर्चेचा विषय ठरले.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सटाणा तालुक्यातील गोलबारे शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधला. मध्यान्ह भोजनात आणरस पुरीचे जेवन होते. स्वतः मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आमरस वाढत ते पंगतीत वाढपे बनले.
यावेळी रस्त्यात ढोलबारे (ता. सटाणा) येथील शाळेला त्यांनी शाळेत्या पहिल्याच दिवशी भेट दिली. जिल्हा परिषदेच्या या शाळेची पटसंख्या १९५ होती. मात्र अवघेत तीस विद्यार्थी हजर असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे मंत्री चांगेलच नाराज झाले. पहिला दिवस असूनही अवघे तीस विद्यार्थी कसे? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांनी शिक्षकांची झाडाझडती घेत, चौकशीचे आदेश दिले.
शाळेचा पहिला दिवस शंभर शाळा भेट उपक्रमाअंतर्गत खासदार राजाभाऊ प्रकाश वाजे यांनी मतदारसंघातील धोंडबार या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. नवागतांची बैल गाडीतुन मिरवणूक काढून प्रवेशोत्सव साजरा केला. याप्रसंगी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक, गणवेश, बूट, मौजे वाटप करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.