सेना, राष्ट्रवादीनेच सरकारचे वाभाडे काढल्याने विरोधी पक्षांची गरजच पडली नाही!

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक निधी वाटपाच्या प्रश्नावर चांगलीच चर्चेत राहिली.
Suhas Kande, Saroj Ahire
Suhas Kande, Saroj AhireSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा नियोजन समितीची बैठक काल आमदारांनी गाजवली. त्यात शिवसेनेचे सुहास कांदे (Suhas Kande) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे (Saroj Ahire) आघाडीवर होते. आमदार कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अनुभवी आमदार स्मीत करीत होते. सत्ताधारी महाविकास आघाडीतील आमदारांनीच सरकारचे एव्हढे वाभाडे की, प्रशासन व मंत्री निरूत्तर झाले.

Suhas Kande, Saroj Ahire
मालेगाव हिंसाचार; रझा ॲकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर मध्यरात्री छापा

गेले दोन वर्षे कोरोनामुळे राज्य शासनाने बहुतांश निधीला कात्री लावली आहे. सर्व लक्ष्य कोरोनाच्या उपाययोजनेवर केंद्रीत केले आहे. त्यामुळे जवळपास नव्वद टक्के निधी कोरोनाकडे वळविण्यात आला. त्यामुळे आमदारांना निधी मिळाला आहे. निधी न मिळाल्याने काही आमदार अक्षरशः कासावीस झाल्याचे चित्र आहे. यामध्ये शिवसेनेचे आमदार कांदे यांनी थेट मतदारसंघातील निधी अन्यत्र वळविल्याचा आरोप करीत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली.

Suhas Kande, Saroj Ahire
प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी हीच शासनाची भूमिका

यावेळी नगरोत्थान योजनेंतर्गत विकास कामे मंजूर करण्याबाबत असमतोल झाल्याचे निर्दशनास आणून देत शिवसेनेचे आमदार कांदे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच आरोप केले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत, हळू बोला, असे सांगितले. त्यावर कांदे यांनी कलेक्टरसाहेब जरा ऐकुण घ्यायला शिका. मी बघतो. मी बोलतो. मी करतो. हे बंद करा. आमदारांना निधी मिळत नाही, अन् तुम्ही असे कसे बोलता. मला हळु बोला असे सांगणारे तुम्ही कोण? असे सुनावले. त्यामुळे बैठकीचा नुरच पालटला.

निधीचे असमान वितरणाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने त्यात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आमदार कांदे यांनी त्यात आघाडी घेतली. समान निधी वाटपाचा आग्रह धरीत, नगरोत्थान योजनेच्या कामांच्या मंजुरीला त्यांनी आक्षेप घेतला. या योजनेत ३६ कोटींचा निधी होता. प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या दीडपट म्हणजेच ५४ कोटींच्या कामांना मंजूरी देण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात १०२ कोटींच्या कामांना मंजुरी दिली. हे कसे काय झाले, यांसह विविध आक्षेप त्यांनी मांडले.

बैठकीतील तापलेले वातावरण पाहून अन्य आमदारांनी त्यात कांदे यांच्या सुरात सुर मिसळला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनीही दोन वर्षे झाली मला निधी मिळत नाही. मग विकासकामे कशी होतील? असा प्रश्न केला. कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांना आश्वासीत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदारच आक्रमकपणे प्रशासनाचे वाभाडे काढत असल्याचे चित्र होते. त्यात भाजपचे डॅा. राहूल आहेर यांनीही नाराजीचा सूर लावला. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची की सरकारचे वाभाडे काढण्याची असा प्रश्न पडला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com