Nandgaon Case : नांदगावमध्ये शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

Nandgaon Case Santosh Gupta Shivsena Politics : शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप.
Shivsena Politics
Shivsena PoliticsSarkarnama

Nandgaon Shivsena News : नांदगाव पोलिसांनी सोमवारी गुटखा आणि गांजा सदृश्य वस्तू सापडल्याचा दावा केला. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शहरात पोलिस विरुद्ध शिवसेना असे वातावरण आहे.

शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता (Santosh Gupta) यांच्या विरोधात सोमवारी पोलिसांनी गांजा आढळल्याचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यामूळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला.

हा गुन्हा खोटा आहे. पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हा प्रकार केला आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. असा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज शहर बंद करण्यात आले.

शिवसेना ठाकरे (ShivsenaUBT) गटाचे नेते गुप्ता यांचे शनी मंदिर परिसरात दुकान आहे. या दुकानात पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन आणि तालुका न्याय दंडाधिकारी सुनील सैंदाणे यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी आठ किलो गांजा कागदात गुंडाळलेल्या स्वरूपात सापडला असा दावा पोलिसांनी केला आहे. विमल गुटखा देखील यावेळी जप्त करण्यात आला.

Shivsena Politics
Chhagan Bhujbal : मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगेंची मागणी; छगन भुजबळ म्हणाले, 'तुझा अभ्यास कमी'

ही घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलिस आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर कोणाच्या तरी सांगण्यावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहे.

गुप्ता हे प्रामाणिक व्यापारी असून गेली 25 वर्ष ते व्यवसाय करतात. त्यांना अडकवण्यासाठी कोणतीही शहानिशा व चौकशी न करता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी रात्री शहर बंद ठेवण्याचे एसएमएस करण्यात आले होते.

Shivsena Politics
Girish Mahajan : गिरीश महाजनांनी उन्मेष पाटलांवर डागली तोफ; म्हणाले, "मित्राला बळीचा बकरा केला अन्..."

शहरात ठीक ठिकाणी फलकही लावण्यात आले होते. आज बाजारपेठ बंद राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन अधिक जोमाने सुरू झाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि फुटीर नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते गणेश धात्रक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com