Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackrey : महापालिका निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरे करणार नाशिकच्या शिवसेनेत खांदेपालट?

Uddhav Thackeray Nashik Shiv Sena News : ठाकरेंच्या पक्ष्यांच्या पदाधिकाऱ्यांना बदलण्यासाठी स्थानिक नेत्यांचा दबाव
Published on

Nashik News: विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात अस्वस्थता आहे. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्याचे कळते.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री येथे बैठक झाली. त्यानंतर लगेचच पक्षाच्या माजी नगरसेवकांनाही बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला दोन नगरसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे पक्षात सर्व काही अलबेल नाही, याचा संदेश वरिष्ठांना गेला आहे.

Uddhav Thackeray
Nashik Crime : मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केली आत्महत्या... काय आहे प्रकरण?

विधानसभा निवडणुकीत आणि त्याआधी शिवसेना पक्षाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना सत्ताधारी पक्षाकडूनही टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला निवडणुकीत अडचणी आल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे सांगितल्याचे कळते. काही पदाधिकाऱ्यांत त्याबाबत नाराजी आहे.

Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : बैठक कुंभमेळ्याची, मात्र नाशिकच्या मंत्र्यांचा फडणवीसांना विसर?

मुंबईत झालेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर निवडणूक करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना बरोबर घ्यायचे किंवा नाही. याबाबत स्थानिक पातळीवर संभ्रम आहे. अशातच काही नगरसेवक पक्षांतराच्या प्रयत्नात असल्याने नवा प्रश्न निर्माण होणार आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीआधीच नाशिकच्या शिवसेनेत खांदेपालट होण्याचे संकेत आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचे प्रयत्न आहेत. महापालिका निवडणूक ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

महायुतीकडून ही निवडणूक अधिक जोरकसपणे लढविली जाण्याची शक्यता आहे. मावळत्या महापालिकेत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत होता. आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची देखील मदत होणार आहे.

त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी भाकरी फिरविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पावले टाकली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लवकरच नाशिकच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नवा चेहरा प्राप्त होईल असे चित्र आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com