Shivsena News : नाशिकमध्ये भाजप 'ना घर का, ना घाट का'

Nashik Lok Sabha Constituency : शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंचा लोकसभा मतदारसंघावर दावा
Eknath Shinde, Hemant Godse, Chandrashekhar Bawankule
Eknath Shinde, Hemant Godse, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News :

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एक बैठक झाली आणि भाजप अस्वस्थ झाला आहे. दोन वर्षांपासून नाशिक लोकसभेवर दावा करणारा भाजप आणि भाजपमधील इच्छूकांच्या स्वप्नावर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होते आहे.

आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. या माध्यमातून नाशिक मतदारसंघावर (Nashik Lok Sabha Constituency) त्यांनी थेट दावा सांगत प्रचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि त्यांचे इच्छूक अस्वस्थ झाले आहेत.

Eknath Shinde, Hemant Godse, Chandrashekhar Bawankule
Chhagan Bhujbal Vs Kunal Darade : भुजबळांसमोर कुणाल दराडेंचे तगडे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नाशिक दौऱ्यातून महायुतीने राज्यातील लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत. त्यानंतर लगोलग आमदार अपात्रता प्रकरणात शिवसेना शिंदेंची यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत महाउत्साह संचारला आहे. हा उत्साह महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला (BJP) चांगलाच अडचणीचा ठरत आहे.

युवा सेना (शिंदेंची शिवसेना) पदाधिकाऱ्यांची नुकतीच शहरात बैठक झाली. यावेळी कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी भविष्यात देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा दावा केला. हे सर्वसाध्य करण्यासाठी आपल्याला नाशिकची लोकसभा निवडणूक जिंकावी लागेल, असे सांगत त्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आत्ताच कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या. या बैठकीला पालकमंत्री दादा भुसे, युवा सेनेचे सचिव किरण साळी, अविष्कार भुसे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभेसाठी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत निश्चित धोरण दिसत नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघावर दोन वर्षांपासून भाजप दाव करत आहे. त्यासाठी काही उमेदवारांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या नियुक्त्यांपर्यंत सर्व काम झाले आहे.

याबाबत प्रदेश कार्यालयाकडून सातत्याने झूम मीटिंगद्वार स्थानिक पातळीवर सूचना दिल्या जात आहेत. असे असताना शिंदे गटाने या जागेवर आपल्या दावा करून प्रचार सुरू केल्याने भाजपमधील इच्छूक उमेदवारांची कोंडी झाली आहे. नक्की जागा कोणाला या गोंधळातून भाजपची संघटन यंत्रणा तयार मात्र इच्छूक उमेदवारांची निराशा दिसून येते.

हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकचे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर पुन्हा शिंदे शिनसेनेचा दावा केला जात आहे. उमेदवारी निश्चित आहे असे समजून गोडसेंनीही प्रचार सुरू केला आहे. त्यातच युवा सेनेच्या मेळाव्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या संदेशाने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या या बैठकीने भाजपची कोंडी केल्याचे चित्र आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com