Shivsena UBT Politics: जळगावला संतप्त शिवसेना ठाकरे पक्षाची निदर्शने, बबनराव लोणीकर यांचा पुतळा जाळला!

Shivsena UBT; Angry Shiv Sena workers protest, burn effigy of BJP MLA Babanrao Lonikar-शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाईची मागणी.
Babanrao Lonikar & Shivsena UBT agitation
Babanrao Lonikar & Shivsena UBT agitationSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News; भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी आणि राज्यातील महिलांविषयी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद जळगाव मध्ये उमटले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून लोणीकर यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. लोणीकर यांच्यावर भाजपने कारवाई करावी अशी मागणी यावेळी झाली.

भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांविषयी अतिशय अवमानस्पद वक्तव्य केले. महिला आणि भगिनींबाबतही अवमान कारक भाषा वापरण्यात आली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपये दिले. महिला आणि भगिनींनाही आमच्याच पैशावर अनुदान मिळते असे विधान लोणीकर यांनी केले होते.

जळगाव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार लोणीकर यांचा निषेध केला. यावेळी जळगाव महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आमदार लोणीकर आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार लोणीकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.

Babanrao Lonikar & Shivsena UBT agitation
Arjun Khotkar Trouble : 'धुळे कॅश' प्रकरणात आमदार अर्जुन खोतकरांची अडचण वाढणार; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आमदार लोणीकर जे बोलले तीच भाजपची हीन दर्जाची वर्तनुक अजवर राहिली आहे. भाजप शेतकरी आणि महिलांचा नेहमीच अपमान करीत असते, असा आरोप यावेळी करण्यात आला.

राज्यातील सत्ताधारी भाजप सध्या अतिशय सत्तेचा गर्व झालेला पक्ष बनला आहे. यापूर्वीही भाजपच्या नेत्यांनी मतदारांना असेच धमकावले होते. सत्ता मिळाली की मतदारांना कस्पटा समजलेखन्याची भाजपची भूमिका राहिली आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

आमदार लोणीकर यांनी राज्यातील सबंध मतदार आणि शेतकरी समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी कितीही सर्वसाधारण केली तरी ते काय बोलले हे प्रत्येकाला समजले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजपने आमदार लोणीकर यांच्यावर कारवाई न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिला.

राज्यातील शेतकरी आणि महिलांचा अपमान करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. पक्षाचे तालुकाप्रमुख उमेश पाटील, युवा सेनेचे अध्यक्ष पियुष गांधी, महिला आघाडीच्या प्रमुख मनीषा पाटील, विभाग प्रमुख विजय बांदल, विजय राठोड यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष सातत्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाविषयी जनतेत गैरसमज होईल असा खोटा प्रचार करीत असते. इतरांवर टीका करणाऱ्या भाजपने आपल्या पक्षाच्या आमदार लोणीकर यांनी जे मुक्ताफळे उधळली आहेत त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. आमदार लोणीकर यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत भाजपने करावी, असे आव्हान यावेळी देण्यात आले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com