Shivsena UBT : ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाला मोठा धक्का; इकडे उमेदवारीची चर्चा, तिकडे मुलावर मोक्का कारवाई

Shivsena UBT Sudhakar badgujars deepak badgujar mcoca : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाशिकमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : शिवसेनेचे (यूबीटी) नाशिक पश्चिम मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सुधाकर बडगुजर यांना मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर आरोपी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक बडगुजर यांच्यावरील कारवाईने राजकीय वातावरण तापणार आहे. दीपक बडगुजर हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

प्रशांत जाधव यांच्यावर दोन वर्षापूर्वी गोळीबार झाला होता. त्याबाबत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यात दोन वर्षे फारसा तपास झालेला नव्हता. आता अचानक त्याच्या तपासात पोलिसांनी गती आणली त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याचा संशय तेव्हा शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Shivsena UBT News
Ajit Pawar News : आधी एबी फॉर्मचे वाटप आता ट्विटरवरून यादी जाहीर; अजित पवार गटाचे स्टार प्रचारक ठरले !

प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात सात आरोपींपैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. गोळीबार प्रकरणात मयूर चमन बेड, बरक्या उर्फ श्रीकांत माणिक वानखेडे, टक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे, आकाश आनंद सूर्यताल, प्रसाद संजय शिंदे, परिणय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे यांना अटक केले असून दीपक सुधाकर बदगुजर हे फरार आहेत.

Shivsena UBT News
Beed District Politics : 13 निवडणुकांमधून बीड जिल्ह्यातून 89 आमदार विधानसभेत; शिवाजीराव पंडितांमुळे एकमेव सुंदरराव सोळंके बिनविरोध!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com