Assembly Election 2024 : नाशिक मध्य मतदारसंघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटातच जुंपणार?

Nashik Central Assembly constituency : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक मध्य मतदारसंघ कोणाला? यावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
uddhav thackeray nana patole
uddhav thackeray nana patolesarkarnama
Published on
Updated on

Congress Vs Shivsena UBT news : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. नाशिक मध्य मतदारसंघ कोणाला यावरून आघाडीतच जुंपण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्य मतदारसंघावर महाविकास आघाडीच्या तिनही पक्षांनी दावा ठोकला आहे. काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ असल्याचा दावा केला जातो. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने येथे जोरदार बांधणी केली आहे. निवडणुकीची तयारी देखील ठाकरे गटाकडून जोरात सुरू आहे.

शिवसेना ( Shivsena ) ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेते रोज विविध भागात मिसळ पार्ट्या करीत आहेत. शिवसेना नेते माजी आमदार वसंत गीते ( Vasant Gite ) यांनी विविध माध्यम उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. विविध समाज घटकांच्या बैठका झाल्या आहेत.

uddhav thackeray nana patole
Sharad Pawar : अजितदादांना मोठा धक्का, नाना महालेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार गीते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघाचा सर्व भाग पिंजून काढला आहेत. आगामी निवडणुकीसाठी सर्वात प्रभावी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेचे दोन माजी महापौर तसेच सर्वाधिक नगरसेवक या भागातील आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सोपा वाटतो.

काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाच्या तयारीला सभासद नोंदणीद्वारे उत्तर दिले जात आहे. माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी विविध भागात मतदार नोंदणी सुरू केली आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली आहे. काँग्रेसचे निरीक्षक ब्रिजकिशोर दत्त, जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल, शहर अध्यक्ष आकाश छाजेड आणि अन्य नेत्यांनी माजी नगरसेवक दिवे यांच्या या उपक्रमाला जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे.

या निमित्ताने काँग्रेसकडून विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली जात आहे. सध्या या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या देवयानी फरांदे ( Devyani Farande ) विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार गीते यांनी जोरदार मोहीम उघडली आहे.

uddhav thackeray nana patole
Kishor Darade Vs Vivek Kolhe : किशोर दराडे जिंकले, चर्चा मात्र विवेक कोल्हेंच्या दमदार लढतीची

या स्थितीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाला? यावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा पारंपारिक मतदार असलेला अल्पसंख्यांक मतदार मोठ्या संख्येने आहे. गेल्या काही निवडणुकात काँग्रेसने येथे उमेदवार दिला आहे. अशा स्थितीत नाशिक मध्य मतदारसंघावरून आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com