Shivsena UBT Politics: शिवसेना ठाकरे पक्ष आयुक्तांवर संतापला, आधी पाणी द्या, मग मीटर बसवा!

Shivsena UBT;Shiv Sena Uddhav Thackeray's party is aggressive against Dhule Municipal Commissioner-धुळे महापालिका आयुक्तांच्या निर्णयांना विरोध करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संतापले
Uddhav Thackrey.
Uddhav Thackrey.Sarkarnama
Published on
Updated on

Dhule Shivsena News: धुळे महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. महापालिका आयुक्तांच्या कामकाजावरून नवा वाद उफाळून आला आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

धुळे महापालिका आयुक्तांनी गेले काही दिवस नव्या निर्णयांचा धडाका लावला आहे. त्याचे पडसाद देखील नागरिकांमध्ये उमटू लागले आहेत. या संदर्भात राजकीय पक्षांना आंदोलनाचा नवा विषय मिळाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Uddhav Thackrey.
Chhagan Bhujbal Politics: आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार समिती सभापतीचा निर्णय छगन भुजबळांच्या हाती!

यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. माजी महापौर भगवान करणकाळ, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. महापालिका आयुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असा त्यांचा आक्षेप आहे.

Uddhav Thackrey.
Dr. Vilas Bachhav Politics: बाजार समितीच्या निकालातून नव्या राजकारणाची चाहूल? प्रस्थापित धास्तावले?

धुळे महापालिकेत गेले दोन वर्ष प्रशासकीय राजवट आहे. या कालावधीत महापालिका आयुक्त यांनी ठेकेदारांना चांगलेच प्रोत्साहन दिले आहे. नागरिक सेवा पुरविण्यासाठी ठेकेदारांवर मोठा खर्च केला जात आहे. नागरिक मात्र या सुविधांबाबत प्रचंड नाराज आहे. बाबत महापालिका आयुक्त आणि प्रशासन कोणतीही दखल घेण्यास तयार नाही.

महापालिकेत सध्या ठेकेदार तुपाशी आणि धुळेकर नागरिक उपाशी, अशी स्थिती असल्याची तक्रार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली आहे. धुळे शहर परिसरात पुरेसे पाणी असताना नागरिकांना चार दिवसांनी एकदा पाणी मिळते. त्यातही आता पाणी मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येत आहे. नागरिकांना वेळेवर पाणी नाही आणि आयुक्त मात्र मीटर बसविण्याचा अट्टहास करीत आहेत. त्याला शिवसेना पक्षाने आक्षेप घेतला आहे.

महापालिकेकडून पाण्याला मीटर बसविणे, जन्म- मृत्यू नोंद २१ दिवसांपेक्षा उशिरा केल्यास प्रति दिन १०० रुपये दंड, ऑनलाइन अर्ज करताना सदोष माहिती दिल्यास 5000 रुपयाचा दंड करण्यात येणार आहे. असे अनेक निर्णय नागरिकांना त्रस्त करीत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष त्याविरोधात मैदानात उतरला आहे.

महापालिका आयुक्त या प्रशासकीय प्रमुख असतात. सध्या महापालिकेत कोणीही लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. अशा स्थितीत दर पंधरा दिवसांनी बैठक घेऊन स्थायी समितीचे अधिकार महापालिका आयुक्त वापरत आहेत. सातत्याने नियमांचा भंग करीत आहे. बाबत आयुक्तांनी तातडीने कामकाजात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल

----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com