मनमाड : शहर (Manmad) शिवसेनेतर्फे (Shivsena) नवीन मिळालेल्या पक्षाच्या नावाचा आणि चिन्ह मशाल (Symbol Flambeau) हातात घेऊन जल्लोष (Cheers) केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आम्ही सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांच्याबरोबर असल्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. (Shivsena Uddhav Thackraysupporters chhers in Manmad with new symbol Flambeau)
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, असे नाव दिल्यानंतर शिवसेनेने सकाळी एकात्मता चौकात जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेतर्फे घोषणाबाजी, फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मशाल पेटवत मशाल चिन्हाचे स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. जय शिवाजी, जय भवानी’ यासह बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आपली निशाणी मशाल आदी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
या वेळी श्री. धात्रक म्हणाले, शिवसेना ही ५६ वर्षे जनमाणसात काम करीत आहे. आमचे कार्यकर्ते ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यावर विश्वास ठेवतात. शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न भाजप व अनेक पक्षांनी केला, मात्र तेयशस्वी होऊ शकले. यंदा पक्षातीलच काही गद्दार लोक फुटले. त्यांना ज्या पक्षाने आमदार व मोठी मोठी पदे दिली, त्या पक्षालाच त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना संपणार नाहीत, गद्दार मात्र लवकरच संपतील.
या वेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, संजय कटारिया, शहराध्यक्ष माधव शेलार, दिलीप सोळसे, लियाकत शेख, मायकल फर्नांडीस, खालिद शेख, प्रमोद पाचोरकर, शैलेश सोनवणे, कैलास गवळी, इरफान शेख, नरेन संसारे, राजेंद्र कासार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.