‘शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी कामाला लागावे’

नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांची आढावा बैठक.
Bhausaheb Choudhary
Bhausaheb ChoudharySarkarnama
Published on
Updated on

देवळा : गटातटाचे राजकारण (Politics) न करता आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti elections) निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी केले.

Bhausaheb Choudhary
मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी केलय!

शिवसेनेच्या देवळा तालुकाप्रमुखपदी मेशी (ता. देवळा) येथील बापू जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार, तसेच जिल्हा परिषदेच्या गट-गणनिहाय आढावा बैठक शासकीय विश्रामगृहावर नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

Bhausaheb Choudhary
दीपिका चव्हाण यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याची ५१ मिनीटे शिवीगाळ!

ते म्हणाले, आगामी निवडणुका या हिंदुत्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या विकासासाठी केलेल्या कामाच्या आधारे आपल्याला जिंकायच्या आहेत. कोरोना कालावधीत महाराष्ट्रात जे काम राज्य सरकारने केले त्याचे देशभर कौतुक होत आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडूव रोज वेगवेगळे मुखवटे धारण करून व वेगवेगळी मंडळी पुढे करून शिवसेनेवर हल्ले केले जात आहेत. मात्र जनतेचा शिवसेनेला पाठींबा असल्याने त्यांचे सर्व डाव उलटले आहेत. त्यादृष्टीने या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

देवळा पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता असून, जिल्हा परिषदेच्या तीन गटांपैकी दोन गटांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा व पक्षप्रमुखांचे हात बळकट करण्यासाठी गावागावांत शिवसेनेच्या शाखा उघडून घराघरांत शिवसेनेचे विचार पोचले पाहिजे यासाठी परिश्रम घ्या, असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले.

बैठकीस जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा संपर्कप्रमुख नवनाथ निच्चीत, उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, तालुकाप्रमुख बापू जाधव, उपजिल्हा संघटक सुनील पवार, महिला जिल्हा संघटक भारती जाधव, तालुका संघटक ज्योती थोरात, उपशहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ आदींसह वसंत सूर्यवंशी, भाऊसाहेब चव्हाण, सतीश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com