Dhule Politics Marathi News: मणिपूरच्या प्रश्नावर राज्यातील आदिवासी भागात नागरिक व संघटनांच्या भावनी तीव्र आहेत. केंद्र सरकार याबाबत हस्तक्षेप करीत नसल्याने आदिवासींनी सरकारचा निषेध केला आहे. याबाबत भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या धुळे मतदारसंघात शक्तीप्रदर्शन झाले. (Trible community deemands Centre should interven in Manipur case)
धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मोर्चा निघाला.त्यातील ने धुळेकरांचे लक्ष वेधले. त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव म्हणाले, मणिपूर येथे आदिवासी कुकी समाजातील महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकारातील नराधमांना तत्काळ फाशी दिली गेली पाहिजे.
हे प्रकरण ७० ते ८० दिवसांपासून मणिपूरमधील शासन या अनैतिक प्रकारात फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे तेथील शासन बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रंगनाथ ठाकरे, उपाध्यक्ष दौलत अहिरे, लक्ष्मण पवार, अनिल अहिरे, महेंद्र माळी, भय्या सोनवणे, विशाल मोरे, सखूबाई भिल, भारत देवरे, पंडित सोनवणे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.